Jay pawar: ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत शरद पवारांच्या नातूचा कारनामा कैमेऱ्यात कैद; पहा व्हायरल फोटोत..

राजकारणी मंडळींना समाजात खूप विचार करून वागावं लागतं. कुठलीही गोष्ट करत असताना, याचा समाजावर तसेच आपल्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही ना, याचा क्षणाक्षणाला विचार करूनच पावले टाकावी लागतात. एखाद्या विषयात बदनामी झाली तर, राजकारणी मंडळींचा राजकारणातून अंत देखील होऊ शकतो. याची अनेक उदाहरणे देखील देता येतील. खासकरून राजकारणात जेवढी जास्त प्रतिष्ठा असते, तेवढीच अधिक काळजी घ्यावी लागते. कारण अशा लोकांवर अनेकांच्या नजरा असतात. राजकारणात असंच एक पवार कुटुंब (Pawar family) देखील आहे. त्यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असतात.

राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबाला एक वेगळं स्थान आहे. या कुटुंबाची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते. विरोधक देखील, या कुटुंबावर जोरदार हल्ला करताना पाहायला मिळतात. या कुटुंबावर टीका केल्या शिवाय, राजकारण सुरू होत नाही, अशी अनेकांची धारणा आहे. आता पुन्हा एकदा पवार कुटुंब चर्चेत आलं आहे, ते ते शरद पवार यांचे नातू ‘जय पवार’ (Jay pawar) यांच्यामुळे.

शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि अजित (Ajit Pawar) पवार यांचे पुत्र जय पवार फारसे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाहीत. Sharad Pawar’s grandson) मात्र त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, पवार कुटुंबाची जोरदार चर्चा रंगली आहे. जय पवार यांचा एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेक चर्चेला चांगलंच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. या दरम्यान पार्थ पवार यांचे देखील पार्टीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हा देखील पवार कुटुंबाची चांगली चर्चा झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा जय पवार यांच्या व्हायरल झालेल्या फोटोमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोटेला (urvarshi Rautela)  सोबत जय पवार यांचा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत उर्वशी रोटेला जय पवार यांच्या बरोबर तिसरी देखील व्यक्ती दिसत आहे. व्हायरल झालेला हा फोटो दुबईतील बुर्ज-अल-अरब येथील असल्याचं बोललं जात आहे. जय पवार उर्वशी सोबत असल्यामुळे, जय पवार नेमके उर्वशी सोबत काय करत होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

व्हायरल झालेल्या फोटोबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून, अनेकांनी उर्वशी रोटेला ही जय पवार यांची गर्लफ्रेंड असल्याचंही म्हटलं आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. उर्वशी रोटेला ही सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव असल्याचं पाहायला मिळते. यापूर्वी उर्वशी रोटेलाचे नाव भारताचा विकेट किपर ऋषभ पंतशी जोडलं गेलं होतं. उर्वशी रोटेला ही ऋषभ पंतची गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा देखील चांगल्याच गाजल्या होत्या.

गेल्या काही महिन्यापूर्वी भाजपचे नेते, किरीट सोमय्या यांनी जय पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जय पवार हे राजकारणात जास्त सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. जय पवार यांच्या नावावर असणारे बेनामी संपत्ती आपण लवकरच जाहीर करणार असून, जय पवार यांचे अनेक कारनामे उघड केले जाणार असल्याचं, देखील भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले होते.

हे देखील वाचा योगींच्या पोलिसांकडून दलित महिलांवर अत्याचार; ‘त्या’ ठिकाणी केली गुरां-ढोरासारखी मारहाण, व्हिडि…

Xiaomi चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे .

यावर क्लिक करून पहा व्हायरल झालेला फोटो

E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी,आणि उठवा सरपंचाचा बाजार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.