Uttar Pradesh: योगींच्या पोलिसांकडून दलित महिलांवर अत्याचार; ‘त्या’ ठिकाणी केली गुरां-ढोरासारखी मारहाण, व्हिडिओ व्हायरल..

कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांच्या उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच (UP police) पाच ते सहा महिलांना गुरां-ढोरां सारखी मारहाण केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. समाजवादी पार्टीच्या (samaj wadi party)  ट्विटर हँडलवरून या मारहाणीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे.

दलितांवर अत्याचार करण्यात नंबर एक असणाऱ्या भाजपशासित उत्तर प्रदेश पोलिसांनी (up police) पुन्हा एकदा आपला कारनामा करून दाखवला आहे. जैनपूर मधील बदलापूर या ठिकाणी पोलिसांकडून दलित महिलांना झालेली मारहाण विचलित करून टाकणारी आहे. या घटनेत दोषी असणाऱ्या पोलिसांवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी असं, या ट्विटर अकाऊंटवरून म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ समाजवादी पार्टीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून, हा व्हिडिओ प्रचंड भयानक असल्याचं पाहायला मिळत आहे.

पाच ते सहा महिलांना बेदम मारहाण केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. (Viral video)  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पिडित महिला त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची निशाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी झालेल्या जखमा, या पीडित महिला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या जखमा डोळ्यांनी पाहवत देखील नाहीत, एवढी ही क्रूरतेने मारहाण करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, पीडित महिला वेदनेने विव्हळत असल्याचं पाहायला मिळत असून, त्या आपल्या अंगावर किती क्रुरपणे मारहाण झाली आहे, हे ओरडून सांगताना देखील पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महिलांना नको त्या ठिकाणी मारहाण झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. अनेक अवघड ठिकाणी महिलांना केलेली मारहाण ही, माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचं समाज माध्यमातून बोललं जात आहे.

या मारहाणीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं, तरी या व्हिडिओत झालेली मारहाण पाहून, अनेकांची तळपायाची आग मस्तकात जात आहे. कायद्याचे रक्षण करणारेच जर अशा प्रकारे महिलांना गुरा ढोरा सारखी मारहाण करणार असतील, तर या घटनेचा निषेध कोणत्या शब्दात करायचा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. असं देखील आता सोशल मीडियावर बोललं जाऊ लागला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या कामगिरीवर गेल्या काही वर्षापासून प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतं. गुन्हेगारांचा आम्ही थेट इन-काउंटर करतो, असं अभिमानाने सांगत असतात. वास्तविक पाहता इन-काउंटर हे कायद्याच्या चौकटीत कुठेही बसत नसताना, देखील योगी आदित्यनाथ मोठ्या अभिमानाने हे सांगताना पाहायला मिळतात. लखिंपुर खेरी, हाथरस उन्नाव, या निंदनीय घटना ताज्या असतानाच, काल घडलेली ही घटना पोलिसांचा कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

 हे देखील वाचा Xiaomi चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल..

या कारणामुळे जीम करत असताना मित्राच्याच डोक्यात टाकली 20 किलो प्लेट; तोल गेल्याचं नाटक करून वाचण्याचा प्रयत्न करत होता पण..,” पहा व्हिडिओ..

E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी,आणि उठवा सरपंचाचा बाजार..

वीस वर्षाच्या कोवळ्या पोराची सहा जणांनी ‘या’ किरकोळ कारणासाठी बोकसून केली ‘ह’ ‘त्या’; घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद..

PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा अॉनलाईन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…

Viral Video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून…

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.