Viral video: ‘या’ कारणामुळे जीम करत असताना मित्राच्याच डोक्यात टाकली 20 किलो प्लेट; तोल गेल्याचं नाटक करून वाचण्याचा प्रयत्न करत होता पण..,” पहा व्हिडिओ

0

कितीही चांगले मित्र असले तरी त्यांच्यात कधी कोणत्या  कारणावरून वाद होईल, आणि त्याचे भांडणात रूपांतर होईल, हे सांगता येत नाही. किरकोळ कारणासाठी मित्रानेच मित्राचा काटा काढण्याच्या अनेक घटना आपण सोशल मीडियावर वाचत असतो, ऐकत असतो. यात विशेष असं काही नाही. मात्र विनाकारण मित्राची ‘बॉडी’ बघवत नसल्याने मित्राचा काटा कोण काढेल का? मात्र ही दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दोन मित्र जिममध्ये (Jim) व्यायाम करत असताना, अचानक दुसऱ्या एका मित्राच्या मनात घाणेरडा विचार आला, आणि व्यायाम करण्यात मग्न असणाऱ्या, आपल्याच सहकाऱ्याच्या डोक्यात तब्बल 20 किलो प्लेट घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पिडित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून, तो आता डेंजर झोन मधून बाहेर आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या व्हिडीओत त्याच्या सहकाऱ्याने जाणूनबुजून 20 किलोची प्लेट डोक्यात घातल्याचं स्पष्ट जाणवत आहे.

मात्र सीसीटीव्हीत जाणून बुजून डोक्यात घातल्याचं दिसत असलं तरी, आरोपीने मात्र आपला तोल गेला असल्याचं नाटक रचल्याची माहीती समोर आली आहे. मात्र  सीसीटीव्हीमध्ये आरोपी आपल्या सहकाऱ्याचा डोक्यात जाणून-बुजून फ्लेट घालत असल्याचं स्पष्ट जाणवत आहे. त्यामुळे त्याने रचलेलं नाटक न्यायालयात देखील चालू शकलं नाही. आणि न्यायालयाने त्याला तब्बल सात वर्षाची शिक्षा सुनावली. विनाकारण जिममध्ये त्याने आपल्या सहकाऱ्याच्या डोक्यात 20 किलोची प्लेट का टाकली? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र, ठोस असं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

ही घटना दोन वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामधील (Australia) डार्विन येथे घडली होती. हे दोघेही अनेक वर्षांपासून डार्विन येथे असणाऱ्या नेक्स्ट लेव्हल जीममध्ये आपला नियमित व्यायाम करत होते. ही घटना घडल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, आणि या प्रकरणाची न्यायालयात प्रक्रिया सुरू होती. दोन वर्षानंतर या घटनेचा निकाल लागला असून, सुप्रीम कोर्टाने आरोपी शेन विल्यिअम रायन याला दोषी ठरवताना सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

विशेष म्हणजे जिमला सुरुवात करण्यापूर्वी या दोघांनीही मैत्रीपूर्ण संवाद साधला. मग अचानक आरोपीने पीडिताच्या  डोक्यात 20किलो प्लेट का टाकली, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळू शकलं नाही. हा मुद्दा आरोपी कोर्टात देखील ओरडून सांगत होता. आम्ही दोघांनी व्यायाम सुरू करण्यापूर्वी संवाद साधला आहे, मी त्याच्या डोक्यात प्लेट का घालू, मी जाणून बुजून हे कृत्य केले नसून, माझा तोल गेल्याने वीस किलोची प्लेट त्याच्या डोक्यात पडली. असा युक्तिवाद आरोपीने केला. मात्र जिममध्ये सीसीटीव्ही असल्याने ही घटना कॅमेरात कैद झाली‌. आणि कॅमेरात आरोपी जाणून-बुजून त्याच्या डोक्यात फ्लॅट घालत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने, न्यायालयाने ही बाब लक्षात आणून देत आपला निर्णय सुनावला.

दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओत, आरोपी फ्लेट घेऊन पीडित व्यक्ती व्यायाम करत होता त्या दिशेने जात असताना दिसत आहे. बरोबर त्याच्या जवळ गेल्यानंतर अचानक तोल गेल्याचं नाटक करून, त्याने जोरात वीस किलोची प्लेट त्याच्या डोक्यात घालताना स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या डोक्यावर प्लेट घातल्यानंतर देखील आरोपी आपला पाय मुरगळला असल्याचं, नाटक करताना दिसत आहे. तर दुसरीकडे पीडित डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा रक्तस्त्राव होत आहे, आणि वेदनेने विव्हळत आहे. मात्र तरीदेखील तो त्याच्याजवळ जात नसल्याचे या व्हिडिओ दिसून येत आहे.

                 सोशल मीडियावर चर्चा

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्‍यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. काही यूजर्सने म्हंटले आहे, कदाचित त्या व्यक्तीला त्याची बॉडी पाहावली नसेल, आपल्यापेक्षा त्याची बॉडी खूपच दमदार आहे कदाचित याच भावनेतून त्याने त्याच्या डोक्यावर फ्लेट टाकली असावी. तर दुसर्‍या एका युजर्सनी म्हटले आहे, कोणाच्या मनात कधी काय येईल, हे सांगता येत नाही. म्हणून जिम जॉईन न करता, घरीच साहित्य मागवून आपला व्यायाम करणं केव्हाही उत्तम.

https://twitter.com/TheCynicalHun/status/1505722517079568385?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1505722517079568385%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Faustralia-man-jailed-for-19-months-for-dropping-20kg-weight-on-fellow-gymgoers-head-sgy-87-2855857%2F

हे देखील वाचा ‘या’ दहा 5G स्मार्टफोनने गाजवलंय मार्केट! ‘यापैकी’ तुम्ही कोणताही फोन खरेदी करू शकता; दमदार कॅमेऱ्यासह भन्नाट फिचर्स, किंमत केवळ…

E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी,आणि उठवा सरपंचाचा बाजार..

स वर्षाच्या कोवळ्या पोराची सहा जणांनी ‘या’ किरकोळ कारणासाठी बोकसून केली ‘ह’ ‘त्या’; घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

M Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा अॉनलाईन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Viral Video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून…

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.