Viral video: नवरीच्या वेशात रानू मंडलने गायलं ‘कच्चा बदाम’ गाणं पण् घडलं भलतंच; तुम्हीच पहा हा विचित्र व्हिडीओ..

0

Viral video: रस्त्यावर गाणी गावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या राणू मंडल तुम्हाला आठवतायत का? एक प्यार का नगमा है। हे गाणं गाताना राणू मंडल (Ranu mandal) सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. राणू मंडलने हे गायलेलं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि अनेकांच्या पसंतीस देखील उतरलं. या गाण्यामुळे रानू मंडलला स्टारडम मिळालं, आणि चक्क ‘रियालिटी शो’मध्ये राणू मंडला गाणं जाण्याची संधी मिळाली. एकूणच काय तर राणू मंडल एका रात्रीत स्टार झाल्या.

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशिमिया यांनी राणू मंडलला लॉन्च देखील केलं. आणि “तेरी मेरी कहानी” हे गाणं शूट देखील केलं. तेरी मेरी कहानी हे गाणं प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडलं. मात्र यानंतर रानू मंडल इंडस्ट्रीतुन गायब झाल्या. आणि पुन्हा रस्त्यावर गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करू लागल्या. यावर अनेकांनी टीका करताना रानू मंडलच्या घमंडीपणाचे हे परिणाम असल्याचं म्हटलं.

रानू मंडलला ओळख मिळाल्यामुळे, त्या आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. पश्चिम बंगालमधील ‘भुबन बड्याकर’ नावाच्या एका शेंगदाणे विकणाऱ्या व्यक्तीने ‘कच्चा बदाम” हे गाणं बनवून स्वतः गायलं, आणि ते तुफान व्हायरलही झालं. सध्या हे गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर अनेक मोठमोठे कलाकार डान्स करताना आपण अनेकवेळा पाहिलं असेल.

आता “कच्च्या बदाम” हे गाणं गाताना राणूमंडल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आहेत. राणू नवरीच्या वेशात “कच्चा बदाम” हे गाणं गात असताना सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सोशल मीडियावर कच्चा बदाम हे गाणं गात असताना राणू मंडळ यांनी या गाण्याची संपूर्ण चाल बदलून टाकली आहे. हे गाणं गात असताना त्यांचा अंदाज फारच विचित्र असल्याचा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

रानू मंडल नवरीच्या वेशात

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ, रानू मंडल कच्चा बदाम हे गाणं गात असताना पाहायला मिळत आहेत. या गाण्यासाठी त्यांनी आपला लूक नवरीच्या वेशात केला आहे. अंगावर लाल साडी घातली असून, या साडीला साजेसे दागिने देखील त्यांनी परिधान केले आहेत. सोशल मीडियावर रानू मंडल यांचा हा नवीन लुक, आणि गाणं गात असताना त्यांचा वेगळा अंदाज काहींना आवडला आहे, तर काहींनी जोरदार टीका देखील केली आहे.

या पूर्वी देखील झाल्या होत्या ट्रोल

एक प्यार का नगमा है! या गाण्यापासून चर्चेत आलेल्या राणू मंडल यांना संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया यांनी “तेरी मेरी कहानी” या गाण्यातून लॉन्च केलं, आणि राणू मंडल एका रात्रीत स्टार झाल्या. मात्र त्यानंतर रानू मंडल गायब झाल्या. आणि पुन्हा एकदा रस्त्यावर गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करताना दिसल्या. यावेळी सोशल मीडियावर अनेकांनी रानू मंडलला ट्रोल केलं. स्टारडम आणि पैसा मिळाला की, लगेच हीने जमीन सोडली आणि म्हणूनच तिची ही अवस्था झाली. अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या.

रानू मंडलला नवी ओळख मिळाल्यामुळे त्या आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गाण्यावर रिल्स बनवताना पाहायला मिळतात. “कच्चा बदाम” या गाण्यापूर्वी रानू मंडलने सहदेवचं ‘बचपन का प्यार’ हे गाणं देखील गायलं होतं. मात्र हे गाणं गायल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. “बचपन का प्यार” या गाण्यानंतर त्यांनी अल्लू अर्जुनच्या “श्रीवल्ली” गाण्याचा हुक स्टेप देखील केला होता. मात्र हा हुक स्टेप करताना त्या चपलीमध्ये अडकून पडता पडता वाचल्या होत्या. तेव्हाही त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.

हे देखील वाचा Viral video: गप्पा मारत असताना अचानक पाचही जण गेले जमिनीत; पुढे काय झालं? तुम्हीच पहा व्हिडिओ

Viral video: हादरवून टाकणारा व्हिडिओ..! शरीरातून अचानक बाहेर काढला आत्मा; पुढे काय घडलं तुम्हीच पहा..

Viral video: फोनवर बोलत रेल्वे रूळ करत होती क्रॉस तेवढ्यात आली ट्रेन..,” पुढे काय झालं? तुम्हीच पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ..

Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या या प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा  घाणेरडं कृत्य..

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; असा घ्या लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.