IPL 2022: पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या ‘मुंबई’चा ‘या’ कारणांमुळे होणार सलग सहावा पराभव; वाचा सविस्तर..

0

IPL 2022: आयपीएल 2022 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा पराभव झाल्याने, क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावर्षी दोन अतिरिक्त संघामुळे मेगा ऑक्शन झाला. मेगा ऑक्शनमुळे अनेक बलाढ्य संघ कमकुवत झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक संघाना आपल्या हुकमी खेळाडूंना सोडावं लागलं. यात सर्वाधिक फटका मुंबई इंडियन्सला (mumbai indians) बसल्याचं पाहिला मिळालं. आणि याचे परिणाम आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांत झाल्याचे तुम्ही पाहिलेच.

आयपीएल 2022 च्या हंगामातील २६वा सामना आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ (Mumbai Indians vs Lucknow super giant) या संघांमध्ये दुपारी साडेतीन वाजता खेळविण्यात येणार आहे. या हंगामात लखनऊ सुपर जॉईंट हा पहिल्यांदा सहभागी झाला असून, केएल राहुलच्या (kl Rahul) नेतृत्वात या संघाने ठीक-ठाक कामगिरी केली आहे. पाच सामन्यांत तीन विजय आणि दोन पराभवासह गुणतालिकेत लखनऊचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यांत पराभव पदरी पडला असून, हा संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात तब्बल पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वातचे जगभरातून कौतुक करण्यात आलं. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीमुळे रोहित शर्माला भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा मिळाली. मात्र आता या हंगामात सलग पाच पराभव झाल्याने, रोहित शर्माच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. कॅप्टनशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यासारखी कारणे देखील असल्याचे पाहायला मिळते.

सलग पाच पराभव होऊन देखील यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. आतादेखील असा पराक्रम होऊ शकतो, असं क्रिकेट वर्तुळात बोललं जातंय, मात्र वास्तविक विचार करायचा झाल्यास, हे एवढं सोपं नाही. याची अनेक कारणे देखील आहेत. कर्णधार म्हणून रोहित शर्माने घेतलेले अनेक निर्णय प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. आज आपण यावरच नजर टाकणार आहोत. सोबतच आज होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जॉईंट मुंबई इंडियन्स संघाला कशी धूळ चारेल, याविषयी देखील जाणून घेणार आहोत.

रोहित शर्माने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्मा हा खेळाला उत्कृष्टरित्या जाणतो, असे बोललं जातं. आयपीएलच्या पाच ट्रॉफी जिंकून देत, रोहित शर्माने हे सिद्ध देखील केलं. आयपीएल परफॉर्मन्सच्या जोरावर रोहित शर्माला भारतीय संघाचे कर्णधारपद देखील मिळाले. मात्र आता या हंगामात रोहित शर्माने केलेल्या कॅप्टनशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.  याची ठोस कारणे देखील आहेत. यापूर्वी मुंबई इंडियन्स प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूला संधी देताना कधीही पाहिलं गेलं नव्हतं. जे या हंगामात होताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग लाईनमध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये असणाऱ्या सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्स संघ पाचव्या क्रमांकाला फलंदाजीला लावत आहे. रोहित शर्माने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचं अनेक क्रिकेट दिग्गज म्हणत आहेत. वास्तविक पाहता सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे गरजेचे आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा बॉलिंग लाईनअप कधीही कमकुवत पाहायला मिळाला नव्हता.  जो या वेळेस पाहायला मिळत आहे. कमकुवत बॉलिंग लाईन असण्याचं आणखी एक कारण म्हणजे, रोहित शर्माने पाच सामन्यात अनेक गोलंदाज बदलले, जे यापूर्वी झालेल्या हंगामात कधीच पाहिला मिळालं नव्हतं.

वारंवार गोलंदाज बदलल्याने गोलंदाजांना देखील लई पकडता येत नाही. हे क्रिकेट चाहत्यांना देखील वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र रोहित शर्माने केलेल्या या चूकांचे परिणाम मुंबई इंडियन्सच्या रिझल्टवर झाल्याचे दिसून आले. खेळाडूंना आपला नॅचरल खेळ करण्यासाठी मुंबई इंडियंसचा ड्रेसिंग रूम प्रोत्साहित करत असतो. आणि हीच या संघाची खूप मोठी ताकद समजली जायची.  मात्र या हंगामात अनेक खेळाडू दडपणात खेळत असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून याचा परिणाम संघाच्या निकालावर होत आहे.

यामुळे होणार सलग सहावा पराभव

मुंबई इंडियन्सचा आज लखनऊ सुपर जॉईंट बरोबर दुपारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना रंगणार आहे. लखनऊ संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ अधिक बलशाली आहे, असे अनेकांना वाटत असलं तरी, असं अजिबात नाही. मुंबई इंडियनपेक्षा लखनऊ सुपर जॉईंट संघाकडे मजबूत गोलंदाजीला आहे. जेसन होल्डर, रवी बिश्नोई, आवेश खान, दुश्मंता चामिरा, कृणाल पांड्या, यासारखे अनेक तारांकित गोलंदाज आहेत.

मुंबई इंडियन्स संघापेक्षा लखनऊ संघाची फलंदाजी देखील थोडीशी मजबूत वाटत आहे. के एल राहुल, डिकॉक, आयुश बदोनी, दीपक हुडा, मार्कस  स्टोइनिस, जेसन होल्डर, कृणाल पांड्या, यासारखे खेळाडू लखनऊ संघाकडे आहेत. दुसरीकडे मुंबई इंडियन्स फलंदाजी मजबूत आहे, मात्र सध्या हा संघ प्रचंड दबावात खेळत आहे. याशिवाय इतर हंगामाप्रमाणे या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू दबावात खेळत असल्याचं जाणवतं. मुंबई इंडियन्स संघाचा ड्रेसिंग रूम आपल्या खेळाडूंना नैसर्गिक खेळ करण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतो, मात्र या हंगामात हे होताना दिसत नाही. आणि याचा मोठा फटका मुंबई इंडियन्स संघाला बसत आहे. आणि म्हणून आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे.

हे देखील वाचा Viral video: नवरीच्या वेशात रानू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं पण् घडलं भलतंच; तुम्हीच पहा हा विचित्र व्हिडीओ..

Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या या प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा हे  घाणेरडं कृत्य

Viral video: गप्पा मारत असताना अचानक पाचही जण गेले जमिनीत; पुढे काय झालं? तुम्हीच पहा व्हिडिओ

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.