Sonalika tiger Electric tractor: जबरदस्त वैशिष्ट्यांसह सोनालिकाने लॉन्च केला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; किंमत फक्त इतकी..

0

Sonalika tiger Electric tractor: इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याने, इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. अनेक बड्या कंपन्यांनी आता आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळवला आहे. फक्त आलिशान चार चाकी गाड्याच नाही, तर आता शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ट्रॅक्टरची निर्मिती देखील इलेक्ट्रिक स्वरूपात झाली आहे. (Electric tractor) शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, यासाठी आता सोनालीका कंपनीने आपला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. (Sonalika tiger electric tractor launch)

शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टर खूप उपयुक्त ठरतो. मात्र डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याने शेती करण्यासाठी ट्रॅक्टर देखील परवडत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च झाला असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाची बचत होणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाने आणि समाधानाचे वातावरण आहे. जाणून घेऊया या ट्रॅक्टर विषयी सविस्तर.

भारतामधील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सोनालिका कंपनीने लॉन्च केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या ट्रॅक्टरची किंमत देखील सहा लाख रुपयांच्या आसपास आहे. कंपनीने या ट्रॅक्टरला सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असं नाव दिलं आहे. (Sonalika tiger Electric tractor) आधुनिक तंत्रज्ञानासह युरोपमध्ये या ट्रॅक्टरची रचना आणि निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच ट्रॅक्टर डिझेल प्रमाणे आवाज न करता अतिशय स्मूथनेस काम करतो.

डिझाईन आणि वैशिष्ट्य

कोणताही चांगला ट्रॅक्टर खरेदी करायचा म्हटलं तर, पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागते. सोनालिकाने लॉन्च केलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत देखील सहा लाख रुपयांचा आसपास आहे. डिझाईन बद्दल जाणून घ्यायचे झाल्यास, हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला पुढे सहा गिअर्स आहेत. त्याचबरोबर पाठीमागे दोन गिअर्स देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची शीट देखील खूप आरामदायी बनवण्यात आली आहे.

या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा पुढचा टायर आकाराने 5-12 तर पाठीमागचा टायर 8-18 देण्यात आला आहे. सोबतच OIB ब्रेक सिस्टीम देखील देण्यात आली आहे. साहजिकच यामुळे या ट्रॅक्टरवर उत्तम नियंत्रण ठेवता येते. सोनालिकाने लाँच केलेल्या या ट्रॅक्टरची वजन क्षमता 500 किलो आहे. सोनालिका ट्रॅक्टर नांगरणीसह शेतीची इतरही कामे करू शकतो.

फीचर्स

इतर ट्रॅक्टर विषयी तुलना करायची झाली, तर हा ट्रॅक्टर प्रचंड कायदेशीर आहे. सोनालीका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची अनेक सारी वैशिष्ट्ये आहेत. सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर दहा तासांमध्ये पूर्ण चार्ज केला जातो. महत्त्वाचं म्हणजे, कंपनीने फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे. त्यामुळे केवळ 4 तासात पुर्ण चार्जिंग करू शकता. इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 25% मध्ये चालतो. उदाहरणार्थ, डिझेल ट्रॅक्टरला एका तासाला जर शंभर रुपये खर्च येत असेल, तर हा ट्रॅक्टर केवळ 25 रुपयांमध्ये एक तास पूर्ण करतो.

फास्ट चार्जिंगच्या मदतीने चार तासात हा ट्रॅक्टर पूर्ण चार्ज केल्यानंतर, तब्बल आठ तास बॅटरी बॅकअप देतो. विशेष म्हणजे, या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा ताशी वेग हा 24.93 किलोमीटर आहे. कंपनीने ग्राहकांना हा ट्रॅक्टर पाच वर्षाच्या वॉरंटीसह प्रदान केला आहे. सोबतच पाच वर्षे वॉरंटी आणि पाच हजार तास असं वॉरंटीचे स्वरूप असणार आहे. याशिवाय इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत या ट्रॅक्टरला कमी मेंटनस येतो.

किंमत

सोनालिका कंपनीने भारतामध्ये लॉन्च केलेल्या टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत पाच लाख 99 हजार रुपये आहे. ही किंमत एक्स शोरूम आहे. ही किंमत सुरुवातीची असून, मॉडेलनुसार किंमत वाढली जाते. सोनालीला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असेल, तर तुम्ही जवळच्या सोनालिका शोरूमला भेट देऊ शकता.

हे देखील वाचा Hero Electric Optima CX: Hero ने लॉन्च केली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, किंमत फक्त इतकी..

Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये हे गुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

PM Kisan Tractor Yojana: शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करताय? थोडं थांबा, सरकार देतंय अनुदान..

Relationship Tips: कमी वेळेत पार्टनरला संतुष्ट करायचंय? जाणून घ्या संबंधाचा हा फंडा..

Railway Recruitment 2023: दहावी आणि ITI झालाय? मग रेल्वेमध्ये मिळवा नोकरी; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.