PM Kisan Tractor Yojana: शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करताय? थोडं थांबा, सरकार देतंय अनुदान..

0

PM Kisan Tractor Yojana: अफाट कष्टाशिवाय शेती करणे शक्य नाही. शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतीची मशागत करावी लागते. साहजिकच ही मशागत एक किंवा दोन माणसाचं काम नसतं. त्यातच शेतीत काम करणाऱ्या शेतमजुराची संख्या देखील दिवसेंदिवस घटत चालल्याचे पाहायला मिळते. दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत चालला असल्याने, आता शेतातली कामे शेतमजुरांकडून करून घेणे परवडत देखील नाही. (Agriculture Mechanization)

अलीकडच्या काळात कृषी यंत्राच्या माध्यमातून शेतीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. सरकार देखील यासाठी अनुदान देत असते. मनुष्यबळा अभावी शेतीची कामे रखडून पडू नये, यासाठी कृषी यंत्राच्या माध्यमातून शेतीची मशागत हा उत्तम पर्याय ठरतो. असं असलं तरी अनेकांना कृषी यंत्र खरेदी करणे शक्य होत नाही. जर तुम्हाला देखील शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल, तर आता सरकार ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देत आहे.

शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान सुधरावे, शेती करण्यासाठी उत्पादन खर्च कमी यावा यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते. पीएम किसान ट्रॅक्टर योजना ही देखील त्यापैकीच एक योजना आहे. केंद्र सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहे. ही योजना फक्त केंद्र सरकारची नाही, तर केंद्र आणि राज्य अशी संलग्न योजना आहे.

किती अनुदान मिळते.

सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे केंद्र आणि राज्य सरकारची ही योजना कृषी विभागामार्फत राबवली जाते. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून ट्रॅक्टरची जी किंमत आहे त्या किमतीच्या 20% रक्कम देण्यात येते. आता आपण योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, हे जाणून घेऊ.

योजनेसाठी पात्रता

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही निकषांची पूर्तता करावी लागते. यामध्ये शेतकऱ्याने यापूर्वी कोणताही ट्रॅक्टर खरेदी केलेला नसणे आवश्यक आहे. कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेसाठी अर्ज करता येतो. सोबतच तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असणे आवश्यक आहे.

मात्र त्याबरोबरच तुमची शेती ही शेती करण्यायोग्य असावी लागते. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ फक्त एकदाच मिळू शकतो. या योजनेअंतर्गत केवळ एकच ट्रॅक्टर शेतकऱ्यांना दिला जातो. आज आपण या योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे द्यावी लागतात? ते जाणून घेऊ.

आवश्यक कागदपत्रे-

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, बँकेचे पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, सातबारा, मोबाईल क्रमांक, आणि पासपोर्ट साइजचे चार फोटो. इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यानंतर, तुमचा अर्ज मंजूर केला जातो. यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटर मधून अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची लगेच पडताळणी करून पुढची प्रोसेस केली जाते.

हे देखील वाचा Relationship Tips: कमी वेळेत पार्टनरला संतुष्ट करायचंय? जाणून घ्या संबंधाचा हा फंडा..

Railway Recruitment 2023: दहावी आणि ITI झालाय? मग रेल्वेमध्ये मिळवा नोकरी; जाणून घ्या डिटेल्स..

NABARD Loan Scheme: शेळीपालनासाठी नाबार्ड देतंय अडीच लाख अनुदान; लगेच करा अर्ज..

business idea: एकही रुपया न गुंतवता घरबसल्या या पाच ऑनलाईन व्यवसायातून करा लाखोंची कमाई..

PM Matritva Vandana Yojana: लग्न झालं असेल तर लगेच करा या पद्धतीने अर्ज; सरकार महिलांसाठी देतंय दरमहा इतके पैसे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.