NABARD Loan Scheme: शेळीपालनासाठी नाबार्ड देतंय अडीच लाख अनुदान; लगेच करा अर्ज..

0

NABARD Loan Scheme: भारत हा कृषिप्रधान देश असला तरी गरिबी या देशातल्या शेतकऱ्याच्या पाचवीला पुजली आहे. अफाट कष्ट करून देखील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढत नसल्याने, आता शेतीबरोबरच जोडधंदा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिक जोमात आणून देखील योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न उत्पादन खर्चापेक्षाही कमीच राहत असल्याचे पाहायला मिळते. साहजिकच यामुळे आता शेतीपूरक जोडधंदा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Goat farming scheme)

शेतीपूरक जोडधंदा करायचा म्हटलं, तरी शेतकऱ्यांना भांडवलाची आवश्यकता असते. प्रत्येकाला जोडधंदा करणे शक्य नसतं. जर तुम्ही देखील शेतीपूरक जोडधंदा करण्याचा विचार करत असाल, आणि तुमच्याकडे भांडवल नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण नाबार्ड शेळीपालन व्यवसायासाठी तब्बल अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान देत आहे.

अलीकडे शेतकरी शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, या शेतीपूरक व्यवसायाकडे वळला आहे. कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न मिळवून देणारे हे व्यवसाय असल्याने, अनेकांना या व्यवसायाची भुरळ पडली आहे. मात्र भांडवलाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना हे व्यवसाय करता येत नाहीत. परंतु आता चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण नाबार्ड हा व्यवसाय करण्यासाठी अनुदान देत आहे.

शेळीपालनासाठी नाबार्डचे अनुदान

शेळी पालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाबार्ड वित्तीय संस्था आणि बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करते. शेतकऱ्यांना नाबार्डच्या माध्यमातून व्यवसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँक, राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक, नागरी बँक या बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करते.

कोणाला किती अनुदान

नाबार्डच्या या योजनेअंतर्गत शेळीपालनासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कॅटेगिरी नुसार अनुदान देण्यात येते. यामध्ये एससी/ एसटी प्रवर्गातील अर्जदारांना 33% सबसिडी दिली जाते. सोबतच बीपीएल श्रेणीतील अर्जदारांना देखील 33 टक्के अनुदान देण्यात येते. तर ओबीसी प्रवर्गातील अर्जदारांना 24 टक्के सबसिडी देण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जास्तीत जास्त अडीच लाख रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाते.

या व्यवसायाचा फायदा

शेतकऱ्यांना या व्यवसायाचा दुहेरी फायदा आहे. शेती असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त किंवा इतर ठिकाणी जागा गुंतवण्याची आवश्यकता भासत नाही. शिवाय शेती करत असल्याने, शेतीसाठी लागणाऱ्या खताची देखील सोय होते. शेतामधील उत्पादन वाढवण्यासाठी लेंडी खत खूप उपयुक्त ठरते. साहजिकच या सगळ्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. आणि म्हणून हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप पूरक आहे.

आवश्यक कागदपत्रे

नाबार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पासपोर्ट आकाराचे चार फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, लाईट बिल, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जात प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

असा करा अर्ज

शेळी पालन व्यवसायासाठी तुम्हाला अनुदान मिळवायचे असेल, तर तुम्हाला शेळीपालन प्रकल्पासंदर्भात सविस्तर तपशील तयार करावा लागणार आहे. थोडक्यात तुम्हाला व्यवसाय योजना अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेत भेट द्यावी लागणार आहे.

त्यानंतर संबंधित बँकेमध्ये तुम्हाला नाबार्डकडून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज भरून द्यावा लागणार आहे. अर्जाची छाननी झाल्यानंतर, संबंधीत अधिकारी तुमच्या प्रकल्पाला भेट द्यायला शेतात येतील. तुम्ही या योजनेच्या लाभासंदर्भात नियम आणि अटींचे पालन केलेले असेल, तर तुमच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम हस्तांतरित केली जाते.

हे देखील वाचा PM Matritva Vandana Yojana: लग्न झालं असेल तर लगेच करा या पद्धतीने अर्ज; सरकार महिलांसाठी देतंय दरमहा इतके पैसे..

PM Kusum Yojana: सौर पंपासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज..

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..

Salman Khan Shilpa Shetty: डेटवर घेऊन जाण्यासाठी शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचला सलमान खान अन् घडलं भलतंच..

business idea: एकही रुपया न गुंतवता घरबसल्या या पाच ऑनलाईन व्यवसायातून करा लाखोंची कमाई..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.