PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..

0

PM Kisan Yojana: शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने (central government) पीएम किसान योजनेची (pm kisan Yojana) सुरुवात केली. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 13 हप्ते जमा झाले असून, शेतकऱ्यांना आता चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. अशातच आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 27 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यावर तेरावा हप्ता जारी केला. केंद्र सरकारने तेराव्या हप्त्याची तब्बल 16, 000 कोटींहून अधिक रक्कम आठ कोटी शेतकऱ्यांना वितरीत केली. शेतकऱ्यांना आता चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असून, या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

14 वा हप्ता मिळविण्यासाठी करा हे काम

पीएम किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याची फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. मात्र तत्पूर्वी ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी आणि बँकिंग प्रक्रिया पूर्ण केली नाही, तसेच बँकखाती आधारशी लिंक केलेली नाहीत, अशा शेतकऱ्याने त्वरित करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, तर तुम्हाला चौदाव्या हफ्त्याबरोबर तेरावा हप्ता देखील मिळणार आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही, तर 14 वा हप्ता देखील अडकणार आहे.

अशी करा ई-केवायसी

जर तुम्ही अजूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तर चिंता करण्याची काही गरज नाही. कारण आपण सोप्या भाषेत ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची? याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर जावं लागणार आहे.

ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन pmkisan.gov.in असं सर्च करा. त्यानंतर पृष्ठावरील ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करा. इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस केल्यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. नवीन पेज उघडलेल्यावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून ‘सर्च’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. समोरील रकान्यात ओटीपी टाकून ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

महत्त्वाकांक्षी योजना

देशातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतला. ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ असं या योजनेला नाव देण्यात आलं. दर चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये ट्रान्सफर केले जातात.

आतापर्यंत एकूण 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिला हप्ता एक एप्रिल ते 31 जुलै या दरम्यान दिला जातो. तर दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ट्रान्सफर केला जातो. आणि वर्षातला तिसरा हप्ता एक डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान दिला जातो. केंद्र सरकार शेतकऱ्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत चौदावा हप्ता हस्तांतरित करण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचाCouple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

Honda Shine 100cc: Hero Splendor Plus ला टक्कर देण्यासाठी Honda Shine 100cc झाली सज्ज; जाणून घ्या कोणती गाडी आहे बेस्ट..

realme smartphone: realme चा हा दर्जेदार स्मार्टफोन मिळतोय फक्त १० हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.