Sugarcane Juice Benefits: कावीळ-मुतखड्यावर रामबाण उपाय आहे हा उन्हाळी ज्यूस; मात्र या 5 लोकांना येणार नाही पिता..

0

Sugarcane Juice Benefits: उन्हाळा म्हटलं की, पोटाला गारवा निर्माण करणाऱ्या पेयांना अधिक मागणी असते. उन्हाळ्यामध्ये एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, मात्र थंड पेय हवंच. असं असलं तरी उन्हाळ्यात नक्की काय प्यायला हवं? हे देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये पेय थंड करण्यासाठी अनेक जण बर्फाचा वापर करतात. तुम्ही बर्फाच्या माध्यमातून थंड केलेल्या पेयांपासून दूर राहणे आवश्यक असते. बर्फाच्या माध्यमातून थंड केलेली पेय पिल्याने आजरी पडण्याची अधिक शक्यता असते.

उन्हाळ्यामध्ये थंड पेया बरोबरच आरोग्याला उपयुक्त असणाऱ्या पेयाचे सेवन तुम्ही केले पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी सर्वात उपयुक्त असणारे पेय म्हणजे, उसाचा रस. (Sugarcane Juice) पोटाला थंड ठेवणारं आणि आरोग्याचे प्रचंड फायदे असणारं पेय म्हणजे, उसाचा रस. उसाच्या रसाचे आरोग्यासंबंधी अनेक फायदे आहेत. परंतु काही लोकांनी उसाचा रस पिणे टाळायला हवं. आज आपण उसाच्या रसाचे फायदे काय आहेत? हे सविस्तर जाणून घेणार आहोत. सोबतच कोणत्या लोकांनी उसाचा रस पिऊ नये, हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्यामध्ये थंड पेयांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. साखर युक्त थंड पेय पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याला पर्याय नैसर्गिक पेय खूप उपयुक्त ठरतं. नैसर्गिक रसामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल पाहायला मिळत नाही. याबरोबरच उसाच्या रसामध्ये फायबर, प्रथिने, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आणि लोह यासारखे पोषक घटक आढळतात. साहजिकच यामुळे उसाचा रस आरोग्यासाठी प्रचंड उपयोगी आहे. (Health Benefits Of Sugarcane Juice)

हे आहेत उसाचा रस पिण्याचे फायदे

उसाचा रस फक्त आरोग्यासाठीच उपयुक्त नाही, तर प्यायला देखील रुचकर आहे. उसाचा रस प्यायल्याने आपल्या शरीराला लगेच ऊर्जा प्राप्त होते. उन्हाळ्यामध्ये अधिक तापमान असल्याने शरीराला सतत घाम येत असतो. घामामुळे शरीरातली ऊर्जा नष्ट होत असते. मात्र या सगळ्या गोष्टींवर उसाचा रस रामबाण उपाय आहे उसाच्या रसाने तुम्ही ताजेतवाने होता.

यकृत मजबूत

यकृत मजबूत होण्यासाठी आहारातून जीवनसत्व, विविध प्रकारची खनिजे आणि अँटिऑक्सिडंट पोटात जाणे आवश्यक असते. उसाच्या रसामधून हे सर्व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. उसाचा रस हा आम्लधर्मी प्रकारात मोडतो. साहजिकच यामुळे शरीरामधील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहण्यास मदत होते. आणि म्हणून नेहमी कावीळ झाल्यानंतर, उसाचा रस प्यायला सांगितला जातो.

उसाचा रस कॅन्सर पेशंटसाठी देखील उपयुक्त आहे. उसाच्या रसामुळे पचनक्रियेत देखील सुधारणा होते. ऊसामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पोटामधील पीएस पातळी नियंत्रणामध्ये राहते. उसाच्या रसामुळे मल्लविसर्जन होऊन पोटाच्या संसर्गापासून आराम मिळतो.

मधुमेहाची समस्या दूर

नैसर्गिक साखरेमध्ये ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी खूप कमी प्रमाणात असते. उसाच्या रसामध्ये देखील नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते. साहजिकच यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना उसाच्या रसाचा फायदा होतो. उसाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पॉलीफेनॉल घटक असतात. जे डायबिटीजचे वेवस्थीत कार्य करतात.

उसाच्या रसाचे दुष्परिणाम 

उसाचा रस पिण्याचे अनेक फायदे असले तरी काही प्रमाणात दुष्परिणाम देखील आहेत. उसाच्या रसामध्ये पोलिकोसॅनॉल नावाचा घटक आढळतो. त्यामुळे उसाच्या रसाचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास झोपेची समस्या उद्भवू शकते. याशिवाय जुलाब या सारखी समस्या देखील निर्माण होऊ शकते. चक्कर, डोकेदुखी, रक्त पातळ अशा काही समस्या उद्भवू शकतात. मात्र याची शक्यता फार कमी आहे.

हे देखील वाचा WTC 2023 Final: या मोठ्या खेळाडूंच्या जागी अजिंक्य रहाणेची टेस्ट टीममध्ये एंट्री; अशी आहे भारताची WTC Final टीम..

Best Selling Bike: 72 हजार किंमत, 80.6 मायलेज असणाऱ्या या गाडीचा नवा विक्रम; या आहेत भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पाच टू-व्हीलर..

Redmi Smartphone: Redmi Note 12 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल; या वेबसाईटवरून आजच करा ऑनलाइन ऑर्डर..

Bank of Baroda Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती; या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

Sports shoes offer: ब्रँडेड कंपनीचे स्पोर्ट्स शूज 300 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्ण संधी; जाणून सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.