Redmi Smartphone: Redmi Note 12 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल; या वेबसाईटवरून आजच करा ऑनलाइन ऑर्डर..

0

Redmi Smartphone: कमी किमतीत दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. अलीकडे स्मार्टफोनचं महत्त्व प्रचंड वाढलं आहे. आता स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही करिअर देखील करू शकता. खास करून कॅमेरा फोनला प्रचंड मागणी आहे. जर तुम्हाला देखील कमी किमतीत उत्कृष्ट कॅमेरा असणारा दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये Redmi या स्मार्टफोन कंपनीने अनेक दर्जेदार उत्पादने मार्केटमध्ये उतरवली आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार स्मार्टफोनची निर्मिती करणे, या कंपनीची खासियत आहे. जसं की, तुम्हाला माहिती आहे, Redmi Note 12 हा स्मार्टफोन देखील ग्राहकांच्या कमालीचा पसंतीच उतरला आहे. आज याच फोन खरेदीवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळत आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या ऑफर विषयी सविस्तर.

फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर (Flipkart e commerce website) अनेक बड्या कंपनीचे स्मार्टफोन तगड्या डिस्काउंटमध्ये विकले जातात. आता पुन्हा एकदा फ्लिपकार्टवर (Flipkart) ग्राहकांना REDMI Note 12 हा स्मार्टफोन ऑफरमध्ये खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 19 हजार रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर तब्बल 21 टक्के डिस्काउंट या स्मार्टफोनवर देण्यात येत आहे. म्हणजेच, तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 15 हजार रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. एवढेच नाही, तर अतिरिक्त दहा टक्के डिस्काउंट देखील तुम्ही मिळवू शकता. यासाठी तुम्हाला या फोनचे पेमेंट एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करायचे आहे.

एक्सचेंज ऑफरचाही घेऊ शकता लाभ

फ्लिपकार्टवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेला REDMI Note 12 हा स्मार्टफोन तुम्हाला 6GB रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह मिळतो. जर तुम्हाला पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्हाला तब्बल 14,500 रुपयांची सूट मिळू शकते. त्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे.

हे आहेत जबरदस्त फीचर्स

हा स्मार्टफोन तुम्हाला कमी किमतीत खरेदी करता येत असला तरी या स्मार्टफोनचे फीचर्स मात्र दमदार आहेत. या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळते. शिवाय अॅक्सेसरीज देखील 6 महिन्यांची आहे. तुम्ही हा स्मार्टफोन आज खरेदी केला तर तुम्हाला उद्यापर्यंत डिलिव्हरी मिळू शकते.

या स्मार्टफोनचा डिस्प्ले दमदार आहे. 6.67 इंचाचा फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले तुम्हाला मिळतो. जो दमदार मानला जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या स्मार्टफोनचा कॅमेरा दमदार आहे. ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोनला देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी 50MP कॅमेऱ्याचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा Ajinkya Rahane: सूर्यकुमार यादवचा पत्ता कट; अजिंक्य रहाणेला मिळणार ही मोठी जबाबदारी..

Bank of Baroda Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती; या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

Sports shoes offer: ब्रँडेड कंपनीचे स्पोर्ट्स शूज 300 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्ण संधी; जाणून सविस्तर..

Jio Recharge Plan: ग्राहकांची चांदी! जिओने सुरू केला 388 दिवसांचा हा दमदार रिचार्ज प्लॅन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.