Ajinkya Rahane: सूर्यकुमार यादवचा पत्ता कट; अजिंक्य रहाणेला मिळणार ही मोठी जबाबदारी..

0

Ajinkya Rahane: सध्या आयपीएलचा (IPL season16) रणसंग्राम सुरू असून अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. काल ईडन गार्डन मैदानावर (Eden garden) खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किग्स (Chennai super kings) संघाने कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata knight riders) संघावर तब्बल 49 धावांनी विजय मिळवत या आयपीएल सीझनमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली. या विजयात अजिंक्य राहणेचा (Ajinkya Rahane) सिंहाचा वाटा होता.

एकीकडे अजिंक्य रहाणे तिनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग नाही. विराट कोहलीच्या (virat kohli) नेतृत्त्वात 2021 ला झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (world test championship) भारताचा पराभव झाल्यानंतर, अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अजिंक्य रहाणेच्या जागेवर नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली. भारतीय निवड समिती नवीन खेळाडूंवर इन्व्हेस्ट करत असल्याने अजिंक्य राहणेची कारकीर्द जवळपास संपुष्टात आल्याचे बोलले गेले.

मात्र आता पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेने क्रिकेट विश्वात वादळ निर्माण केलं आहे. सध्या रहाणे आपल्या कारकिर्दी मधील सर्वोत्कृष्ट फलंदाजी या आयपीएल सीझनमध्ये करत आहे. अजिंक्य रहाणेच्या खेळामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यापूर्वी आपल्या करिअरमध्ये अजिंक्य रहाणेने इतकी उत्कृष्ट फटकेबाजी कधीही केली नव्हती. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात अजिंक्य रहाणे जबरदस्त बहरत आहे.

डोमेस्टिक सीझनमध्ये देखील अजिंक्य रहाणेने चांगली फलंदाजी केली होती. साहजिकच त्याचा फायदा त्याला आयपीएलमध्ये होताना दिसत आहे. रहाणेने या सिझनमध्ये आतापर्यंत ५ मॅच मध्ये जवळपास २०० च्या स्ट्राईक रेट आणि ५२ च्या सरासरीने २०९ धावा केल्या आहेत. राहण्याचा हा फॉर्म आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळवून देणार असल्याचं आता बोललं जाऊ लागलं आहे.

सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताने प्रवेश केला आहे. 7 जूनला ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर देखील हा सामना खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादव देखील कसोटी क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवू शकला नाही. अशात आता अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघ स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादव अजिंक्य राहण्याची निवड करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. धोनीच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये रहाणे करत असलेली उत्कृष्ट कामगिरी त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवून देणारी ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अजिंक्यची निवड अधिकृतरित्या झाली नसली, तरी कसोटी संघात अजिंक्य रहाणेचे स्थान निश्चित मानलं जात आहे. साहजिकच यामुळे त्याच्या कारकीर्दीला पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा Bank of Baroda Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती; या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

Sports shoes offer: ब्रँडेड कंपनीचे स्पोर्ट्स शूज 300 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्ण संधी; जाणून सविस्तर..

Jio Recharge Plan: ग्राहकांची चांदी! जिओने सुरू केला 388 दिवसांचा हा दमदार रिचार्ज प्लॅन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.