WTC 2023 Final: या मोठ्या खेळाडूंच्या जागी अजिंक्य रहाणेची टेस्ट टीममध्ये एंट्री; अशी आहे भारताची WTC Final टीम..

0

WTC 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS WTC final) यांच्यामध्ये खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय टेस्ट संघाची निवड करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे टेस्ट टीममध्ये अजिंक्य रहाणेची भारतीय टेस्ट संघात निवड करण्यात आली आहे. (Ajinkya Rahane select test team ting) इंग्लंडमधील ओव्हर मैदानावर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळायचा आहे. हा सामना 7 जून 2023 ला पार पडणार आहे. (India announced 15-man squad for World Test Championship 2023 final)

अजिंक्य राहण्याची कारकीर्द संपुष्टात आली आहे, असं वाटत असताना महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh dhoni) स्पर्श राहणेला होतो. आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai super kings) संघाकडून खेळताना या सीजनमध्ये अजिंक्य रहाणे अनेक क्रिकेट विश्लेषकांच्या तोंडाला कुलूप लावत वादळ निर्माण करतो. अजिंक्य रहाणे टी ट्वेन्टी क्रिकेट खेळू शकत नाही, असं अनेक क्रिकेट विश्लेषकांचे म्हणणं होतं. मात्र याला छेद देत राहणे 360 फटकेबाजी करत सूर्यकुमार यादवचा पत्ता आता कट केला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंची निवड केली आहे. त्यामध्ये पाचव्या क्रमांकासाठी अजिंक्य राहणेची फलंदाज म्हणून निवड केली आहे. सूर्यकुमार यादवला बाहेरचा रस्ता दाखवत त्याच्या जागी रहानेचा सामावेश केला आहे. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता चाहत्यांना 2.0 अजिंक्य रहाणे पाहायला मिळणार आहे.

घरेलू क्रिकेटमध्ये देखील अजिंक्य रहाणेने उत्तम कामगिरी केली होती. याशिवाय आयपीएलमध्ये देखील भन्नाट फलंदाजी करत असल्याने राहणेला थेट भारतीय कसोटी संघात आता स्थान मिळालं आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे अनुपस्थित असल्याने, त्याच्या जागी अजिंक्यला संधी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चाहत्यांना रहाणेचे हे नवीन वर्जन आता पाहायला मिळू शकते. तब्बल दोनशेच्या स्ट्राईक रेटने रहाणे सध्या आयपीएलमध्ये धावा काढत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सूर्यकुमार यादवला (SuryaKumar yadav) संधी देण्यात आली होती. मात्र या सिरीजमध्ये सूर्यकुमार यादव सपशेल अपयशी ठरला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना असल्याने नवीन खेळाडूंना संधी देणं धोक्याचं ठरू शकतं. याशिवाय अजिंक्य रहाणेने विदेशात दमदार कामगिरी केली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून रहाणेचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

असा आहे भारतीय संघ 

रोहित शर्मा (कॅप्टन) शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी के एल राहुल, के एस भरत शार्दुल ठाकूर, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आणि जयदेव उनादकट.

हे देखील वाचा Ajinkya Rahane: सूर्यकुमार यादवचा पत्ता कट; अजिंक्य रहाणेला मिळणार ही मोठी जबाबदारी..

Best Selling Bike: 72 हजार किंमत, 80.6 मायलेज असणाऱ्या या गाडीचा नवा विक्रम; या आहेत भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पाच टू-व्हीलर..

Redmi Smartphone: Redmi Note 12 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल; या वेबसाईटवरून आजच करा ऑनलाइन ऑर्डर..

Bank of Baroda Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती; या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

Sports shoes offer: ब्रँडेड कंपनीचे स्पोर्ट्स शूज 300 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्ण संधी; जाणून सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.