MahaDBT Scheme: आता मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार शेततळे, ठिबक सिंचन, फळबाग; जाणून घ्या सविस्तर..

0

MahaDBT Scheme: शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सरकार अनेक योजना राबवते. अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील अलीकडच्या काळात झाला आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक योजना देण्याचा निर्णय घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मागेल त्याला शेततळे ही योजना मोठ्या प्रमाणात गाव पातळीवर राबवली होती. मात्र महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर, आता पुन्हा एकदा ही योजना सुरू करण्यात आली आहे. कृषी विभागाकडून या संदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, 25 एप्रिलला शासन निर्णय देखील झाला आहे.

कृषी विभागाच्या काही योजना संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये शेततळे, प्लास्टिक अस्तरीकरण, फळबाग, कॉटन श्रेडर, बीपीएफ पेरणी यंत्र, ठिबक तुषार सिंचन, या योजनांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी सरकारने या योजना लागू केल्या आहेत. या योजना राबवण्यासाठी सरकारने तब्बल 2023/24 या आर्थिक वर्षामध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या योजना राबवल्या जाणार

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना “मागेल त्याला फळबाग योजना” देण्याचे काम कृषी विभागाकडून केले जात आहे. मागेल त्याला ठिबक तुषार सिंचन; राष्ट्रीय कृषी विकास योजेअंतर्गत, पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मागेल त्याला ठिबक तुषार सिंचन पुरवठा कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

मागेल त्याला शेततळे

“मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने”च्या माध्यमातून लागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे देण्याचे काम कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. अटी आणि शर्तीची पूर्तता केल्यानंतर, मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे देण्यात येत आहे.

मागेल त्याला शेततळ्याचे अस्तिरिकरण

राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळ्याचे अस्तिरीकरण करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील काही अटी आणि शर्ती आहेत. त्या शेतकऱ्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयाला भेट द्यावी लागणार आहे. किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधल्यानंतर, या योजनांविषयी सविस्तर अपडेट तुम्हाला मिळेल. यासाठीचा अर्ज देखील तुम्हाला या विभागात मिळेल. अर्ज व्यवस्थित भरून तुम्ही कृषी विभागात सबमिट करणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीने देखील तुम्ही योजनांचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्ही जवळच्या common service centre ला भेट द्या. या योजनांविषयी सविस्तर माहिती खालील तक्तावर पाहा.

 

 हे देखील वाचाMangoes Buying Tips: या तीन गोष्टी तपासून ओळखता येतो आंबा गोड आहे की आंबट; जाणून घ्या या तीन सोप्या ट्रिक्स.. 

land area calculator: मोबाइलवरुन 5 मिनिटात मोजता येतेय जमीन; लगेच जाणून घ्या ही सोपी प्रोसेस..

RCB vs KKR: हे चार खेळाडू खेळतात गल्ली क्रिकेट, आमची जिंकण्याची लायकी नाही; विराटच्या विधानाने खळबळ..

IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

Smartphone Under 10K: कॅमेरा, बॅटरी दमदार असणारे हे 6 स्मार्टफोन मिळतायत 10 हजाराच्या आतमध्ये; जाणून घ्या लगेच..

Air Cooler: आता घरच्या घरी बनवा 500 रुपयांत दमदार कूलर; पाहा हा जुगाड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.