Smartphone Under 10K: कॅमेरा, बॅटरी दमदार असणारे हे 6 स्मार्टफोन मिळतायत 10 हजाराच्या आतमध्ये; जाणून घ्या लगेच..

0

Smartphone Under 10K: स्मार्टफोन (smartphone) ही आता काळाची गरज बनली आहे. स्मार्टफोन शिवाय श्वास घेणं देखील अवघड वाटू लागलं आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून आता करिअर देखील होत असल्याने, स्मार्टफोनला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. ग्राहकांना देखील स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. साहजिकच यामुळे अनेकांना कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी देखील मिळाली आहे. जर तुमचं देखील बजेट कमी असेल, आणि तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आम्ही असे सहा दमदार स्मार्टफोन घेऊन आलो आहोत, ज्याची किंमत दहा हजार रुपयांच्या आतमध्ये आहे. (Best Smartphone selling under 10000)

Samsung Galaxy F04 

जर तुमचं बजेट दहा हजार रुपयांच्या आतमध्ये असेल, आणि तुम्हाला सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला Samsung चा दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. Samsung Galaxy F04 असं या स्मार्टफोनचे नाव आहे. ६.५ इंचाचा डिस्प्ले असणारा हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 9 हजार 250 रुपयांत खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनला तब्बल 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Oppo A17k

Oppo A17k हा स्मार्टफोन देखील तुम्हाला केवळ 9 हजार 499 रुपयांत खरेदी करता येत आहे. कॅमेऱ्यासाठी हा फोन दर्जेदार आहे. या फोनला 6.56 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 8MP प्राइमरी कॅमेरा आहे. तर तब्बल 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Motorola G31

Motorola G31 हा स्मार्टफोन ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, या स्मार्टफोनला प्रायमरी कॅमेरा दमदार आहे. किंमती विषयी सांगायचं झालं, तर हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ साडेनऊ हजार रुपयांत खरेदी करता येत आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन 6.4 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह ग्राहकांना मिळतो. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता तब्बल 5,000mAh असल्याने बॅटरी बॅकअप दमदार आहे. या फोनचा प्रोसेसर देखील कमाल आहे. MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळतो.

Redmi 10 

Redmi या कंपनीने देखील ग्राहकांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. फीचर्स प्रोव्हाइड करत असल्याने या कंपनीकडे असंख्य ग्राहक जोडले गेले आहेत. रेडमी कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करणार असेल, तर तुम्हाला हा स्मार्टफोन 9 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला यामधे 6.7 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. महत्त्वाचं म्हणजे, या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप मिळतो. सोबतच तुम्हाला 6000 mAh क्षमतेची बॅटरी देखील मिळते.

Realme C33

Realme कंपनीचा दमदार स्मार्टफोन तुम्हाला दहा हजार रुपयांच्या आतमध्ये खरेदी करण्याची संधी आहे‌. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनला तब्बल 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला देखील तुम्हाला 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता देखील 5,000 mAh असणार आहे.

Vivo Y15s 

तुम्ही विवो या स्मार्टफोनचे चाहते असाल, तर तुम्हाला या कंपनीचा देखील स्मार्टफोन साडेनऊ हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची मोठी संधी आहे. या स्मार्टफोनचा देखील कॅमेरा दमदार आहे. स्मार्टफोन प्रोसेसर देखील जबरदस्त आहे. तुम्हाला यामध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर मिळतो. जो उत्तम मानलं जात आहे. सोबतच 6.51 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देखील या स्मार्टफोनला देण्यात आला आहे.

हे देखील वाचा Air Cooler: आता घरच्या घरी बनवा 500 रुपयांत दमदार कूलर; पाहा हा जुगाड..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

Mini Air Cooler: पाच मिनिटात रूम थंड करतोय हा मिनी कूलर; या वेबसाईटवर मिळतोय फक्त ५०० रुपयांत..

Sugarcane Juice Benefits: कावीळ-मुतखड्यावर रामबाण उपाय आहे हा उन्हाळी ज्यूस; मात्र या 5 लोकांना येणार नाही पिता..

Best Selling Bike: 72 हजार किंमत, 80.6 मायलेज असणाऱ्या या गाडीचा नवा विक्रम; या आहेत भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पाच टू-व्हीलर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.