Mangoes Buying Tips: या तीन गोष्टी तपासून ओळखता येतो आंबा गोड आहे की आंबट; जाणून घ्या या तीन सोप्या ट्रिक्स..

0

Mangoes Buying Tips: सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे. शाळेला देखील उन्हाळ्याची सुट्टी लागल्या असल्याने, अनेक जण गावी जातात. या काळामध्ये पाहुण्या मंडळीची देखील मोठ्या प्रमाणात ये जा होत असते. याशिवाय आंब्याच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात लग्नाच्या थिती देखील असतात. खासकरून मे महिला लग्नाचा महिना म्हणून ओळखला जातो. साहजिकच नवरदेवाला नवरीला जेवायला बोलावलं जातं. केवळण म्हणजेच ग्रामीण भाषेत त्याला गडांगण म्हणतात. ग्रामीण भागात गडांगणाला सर्रास आमरस चपाती केली जाते. (Identify whether the mango is sweet or sour)

उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सिझन असल्याने, प्रत्येक कुटुंबात आवडीने आमरस चपाती हा पदार्थ केला जातो. आमरस उत्तम होण्यासाठी अर्थात चांगल्या आंब्याची आवश्यकता असते. सर्व मंडळी गोड आमरस खाण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी जर आंबट आंबे लागले, तर जेवणाचा संपूर्ण बेत खराब होऊन जातो. आणि म्हणून बाजारातून आंबे विकत घेताना कोणता आंबा आंबट आणि गोड आहे (sour and sweet) हे तुम्हाला माहिती असायला हवं. आज आपण गोड आंबा कसा ओळखायचा? या संदर्भात तीन महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत.

आंब्याच्या देठाची जाडी पाहा

आंबा गोड आहे की आंबट? हे ओळखायचं असेल, तर तुम्ही आंब्याच्या जो वरच्या भागाला देठ पाहायला मिळतो. हा देठ जर लहान असेल, आणि थोडा हिरवा ओलसर पाहायला मिळत असेल, तर आंबा व्यवस्थित पिकला नाही. शिवाय आंबा गोड देखील नाही. असा त्याचा अर्थ होतो. आंब्याचा देठ जर जाड असेल, आणि काळा पडलेला असेल, वाळलेला असेल, तर आंबा व्यवस्थित पिकला असून तो गोड देखील आहे, असं म्हटले जाते.

देड जर हिरवा, ओलसर असेल शिवाय काळा असेल, मात्र लहान असेल तर असा आंबा झाडाला पिकायच्या अगोदरच काढलेला असतो. आणि कृत्रिम पद्धतीने पिकवलेला असतो. दुसरीकडे जर आंब्याचा देठ जाड असेल, आणि तो पूर्ण काळा पडला असेल तर तो आंबा झाडालाच पिकलेला असतो. आणि म्हणून असा आंबा गोड असतो.

आंब्याच्या तळ पाहा

आंबा गोड आहे की आंबट हे, ओळखायचं असेल तर दुसरी पद्धत म्हणजे आंब्याचा तळ पाहणे आवश्यक असते. आंब्याचा तर काळा पडला असेल किंवा कोरडा असेल, सोबतच आंब्यावर जर खालच्या बाजूला सुरकुत्या पडल्या असतील, तर असा आंबा पिकून खूप दिवस झालेले असतात. त्यामुळे आंबा खराब निघण्याची शक्यता असते. शिवाय गोड देखील लागत नाही. आंब्याचा तळ जर पिवळा आणि काही प्रमाणात हिरवा पाहायला मिळत असेल, तर आंबा ताजा आणि गोड लागतो. म्हणून सुरकुत्या पडलेला आंबा अजिबात खरेदी करायचा नाही.

आंब्याच्या सुगंध महत्वाचा

आंबा व्यवस्थित पिकला आहे की नाही, आणि गोड आहे की नाही, हे पाहायचं असेल तर तुम्ही आंबा हलक्या पद्धतीने दाबून पाहायचा आहे. आंबा दाबला जात असेल, तर तो व्यवस्थित पिकलेला आणि गोड असतो. व्यवस्थित पिकलेला आणि गोड असणाऱ्या आंब्याचा सुगंध देखील गडद आणि घ्यावासा वाटतो. आंब्याचा वास तिखट आणि व्हिनेगार येत असेल तर समजून जा आंबा आंबट आहे. या तीन पद्धतीने आंबा गोड आहे की आंबट, हे तपासून आंबे खरेदी करू शकता. आंबा छोटा किंवा मोठा याच्याशी गोड आणि आंबटचा काही संबंध नसतो.

हे देखील वाचा land area calculator: मोबाइलवरुन 5 मिनिटात मोजता येतेय जमीन; लगेच जाणून घ्या ही सोपी प्रोसेस..

RCB vs KKR: हे चार खेळाडू खेळतात गल्ली क्रिकेट, आमची जिंकण्याची लायकी नाही; विराटच्या विधानाने खळबळ..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

Best Selling Bike: 72 हजार किंमत, 80.6 मायलेज असणाऱ्या या गाडीचा नवा विक्रम; या आहेत भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पाच टू-व्हीलर..

Smartphone Under 10K: कॅमेरा, बॅटरी दमदार असणारे हे 6 स्मार्टफोन मिळतायत 10 हजाराच्या आतमध्ये; जाणून घ्या लगेच..

Air Cooler: आता घरच्या घरी बनवा 500 रुपयांत दमदार कूलर; पाहा हा जुगाड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.