RCB vs KKR: हे चार खेळाडू खेळतात गल्ली क्रिकेट, आमची जिंकण्याची लायकी नाही; विराटच्या विधानाने खळबळ..

0

RCB vs KKR: आयपीएलच्या (IPL season16) सोळाव्या हंगामातील 36 वा सामना काल बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (royal challengers Bangalore vs Kolkata knight riders) या दोन संघांमध्ये चिन्हस्वामी क्रिकेट मैदानावर पार पडला. (Chinnaswamy cricket ground) नाणेफेक जिंकून विराट कोहलीने (Virat Kohli) प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजानी ठिकठाक कामगिरी केली. मात्र क्षेत्ररक्षकांनी सुमार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना कोलकत्ता संघाने 200 धावा केल्या. मात्र 200 धावांचे आव्हान बेंगलोर संघाला पेलवलं नाही. 20 षटकात बेंगलोर संघाला 179 धावांपर्यंत मजल मारता आली.

चिन्हस्वामी क्रिकेट मैदानावर दोनशे धावांचे आव्हान फार मोठं आव्हान नव्हतं. 200, 225 धावा या मैदानावर सहज चेस होताना अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र आरसीबी संघाकडे विराट कोहली (Virat kohli) फाफ डुप्लेसी (Faf du Plessis) ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हे तीन फलंदाज वगळता एकाही फलंदाजाने या हंगामामध्ये चांगली फलंदाजी केली नाही. या तीन फलंदाजाव्यतिरिक्त आरसीबी संघात एकही फलंदाज सामना जिंकून देऊ शकेल असं कुठेही वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

आयपीएलच्या हंगामात आरसीबीने (RCB) आतापर्यंत ऐकून आठ सामने खेळले आहेत. आठ सामन्यांमध्ये चार विजय आणि चार पराभवासह गुणतालिकेत आरसीबीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने जिंकलेल्या चार सामन्यात गोलंदाज आणि ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, आणि फाफ याच खेळाडूंचा विजयात सहभाग राहिला आहे.

पराभवानंतर विराट कोहलीने आपल्या टीमला धारेवर धरत अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. पराभवानंतर प्रेझेंटेशनमध्ये विराट कोहली बोलताना म्हणाला, आमची जिंकण्याची बिलकुल लायकी नव्हती. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांनी हा सामना कोलकत्याच्या झोळीत टाकला. आमचा संघ प्रोफेशनल क्रिकेट खेळत नाही. असे देखील धक्कादायक विधान विराट कोहलीने केले. याच पद्धतीने खेळ करून जिंकण्याची आशा करणे म्हणजे मूर्खपणा आहे. असं देखील विराट कोहली म्हणाला.

सुरुवातीला आमचे खेळाडू बाद झाले. मात्र आम्ही सामना बनवला होता. कोलकत्ता संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली नाही. आम्ही खराब फटके मारून बाद झालो आहोत. ज्या चेंडूवर आमचे खेळाडू बाद झाले ते चेंडू विकेट टेकिंग नक्कीच नव्हते. आमचे चार खेळाडू चुकीचे फटके मारून बाद झाले. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने खेळ केला जाऊ शकत नाही. असे देखील विराट कोहली म्हणाला.

विराट कोहलीने पराभवाला फलंदाज आणि क्षेत्ररक्षणकांना जबाबदार धरलं. नितीश राणाचे दोन सोपे झेल RCB संघाने सोडले. यात हर्षल पटेलचा देखील समावेश होता. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, आणि महिपाल रोमरोर हे खेळाडू खराब फटके मारून बाद झाले. विराट कोहलीने सामन्यानंतर या खेळाडूंची प्रत्यक्ष नावं घेतली नसली तरी विराट कोहलीने याच खेळाडूंना धारेवर धरत अप्रत्यक्ष टोला लगावला.

विराट कोहलीने केलेल्या अनेक विधानामुळे आरसीबी आता प्लॅनिक होणार, की आरसीबीचा खेळ बहरणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महेंद्रसिंग धोनीने देखील पराभवानंतर आपल्या गोलंदाजाला याच प्रमाणे दम दिला होता. धोनी म्हणाला होता, जर तुम्ही अशाच प्रकारे वाईट आणि नो बॉल टाकत राहिला, तर पुढच्या सामन्यात तुम्ही नवीन कर्णधारासह मैदानात उतराल.

हे देखील वाचा IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

Smartphone Under 10K: कॅमेरा, बॅटरी दमदार असणारे हे 6 स्मार्टफोन मिळतायत 10 हजाराच्या आतमध्ये; जाणून घ्या लगेच..

Air Cooler: आता घरच्या घरी बनवा 500 रुपयांत दमदार कूलर; पाहा हा जुगाड..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

WTC 2023 Final: या मोठ्या खेळाडूंच्या जागी अजिंक्य रहाणेची टेस्ट टीममध्ये एंट्री; अशी आहे भारताची WTC Final टीम..

Best Selling Bike: 72 हजार किंमत, 80.6 मायलेज असणाऱ्या या गाडीचा नवा विक्रम; या आहेत भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पाच टू-व्हीलर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.