Google search: नवीन लग्न झालेल्या मुली गुगलवर सर्च करतात या पाच धक्कादायक गोष्टी; दुसरी आहे फारच भयानक..

0

Google search: लग्न (marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा असतो. लग्नापूर्वी मुलं मुली आपला वैवाहिक जोडीदार कसा असेल, याची कल्पना करून ठेवत असतात. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं. खासकरून मुलींसाठी लग्नानंतरचे आयुष्य हे आव्हानात्मक असल्याचं बोललं जातं. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुटुंबातील सदस्यांसोबत देखील एकरूप होण्याचं मोठं आव्हान मुलींपुढे असतं.

लग्नानंतर मुली आपल्या नवऱ्याविषयी अधिक जागरूक असतात. आपला नवरा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा असावा, असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. मात्र एका सर्वेनुसार लग्नानंतर मुली गुगलवर काही धक्कादायक गोष्टी देखील सर्च करताना समोर आले आहे. मुली गुगलवर सर्च करताना आपल्या नवऱ्याच्या आवडी-निवडी काय आहेत? या गोष्टी देखील सर्च करतात. मात्र ही झाली सामान्य बाब. याशिवाय मुली Google वर आणखी चार गोष्टी सर्च करतात ज्या जाणून तुमच्या पायाखाली जमीन सरकू शकते.

नवऱ्याने त्याच्या आई-वडिलांपेक्षा मला अधिक महत्त्व द्यावं, असं वाटणारा देखील मोठा वर्ग असल्याचा समोर आलं आहे. नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं? हा टॉपिक सर्वाधिक सर्च केलं गेलं आहे. कदाचित तुम्हाला हे विचित्र वाटेल, मात्र हे खरे आहे. एका सर्वेनुसार लग्न झाल्यानंतर, मुली आपल्या नवऱ्याला मुठीत कसं ठेवता येईल, या विषयी माहिती घेतात.

लग्नानंतर मुलींनी सर्च केलेल्या यादीमध्ये दुसरा क्रमांक लागतो, पतीला आपला गुलाम कसं बनवायचं. आपला नवरा हा आपला दिवाना असावा, असं अनेक जणींना वाटत असतं. आपली प्रत्येक गोष्ट नवऱ्याने ऐकायला हवी. आपण सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, यासाठी काय करायला हवं? हा विषय लग्न झाल्यानंतर मुली गूगलवर सर्च करत असल्याचं समोर आलं आहे.

याशिवाय लग्नानंतर मुली आपल्या नवऱ्याला घायाळ कसं करता येईल, या संदर्भात गूगलवर सर्च करतात. आपल्या नवऱ्याला आपलं वेड लागायला हवं. आपल्या नवऱ्याने इतरांपेक्षा आपलाच सर्वाधिक विचार करायला हवा, असं मुलींना वाटत असतं. यासाठी काय करायला हवं, हे गुगलवर सर्च करतात. आपल्या शिवाय आपल्या नवऱ्याने कुठेही पाहू नये, सतत आपलाच विचार करावा. आपल्याच पाठीमागे चिटकून राहावं, यासाठी काय करायला हवं? हे मुली गुगलवर सर्च करत असल्याचं समोर आलं आहे.

आपल्या नवऱ्या विषयी मुली गुगलवर काही धक्कादायक गोष्टी सर्च करत असलल्या तरी काही चांगल्या गोष्टी देखील सर्च करतात. आपलं प्रेम व्यक्त कसे करावे, हा विषय देखील मुलगी गूगलवर सर्च करतात. आपल्या पतीला खुश ठेवण्यासाठी काय करता येईल? कोणते गिफ्ट द्यावे? डेट विषयी प्लॅनिंग कशी करावी? हा टॉपिक मुली गुगलवर सर्च करतात.

लग्नानंतर मुली आपल्या कुटुंबाला कसं खुश ठेवता येईल? हा विषय देखील गूगलवर सर्च करतात. लग्नाविषयी अनेकांची वेगवेगळी स्वप्ने असतात. असं असलं तरी कुटुंबात कोणतेही वाद नसावेत, असं प्रत्येक मुलीला वाटत असते. आणि म्हणून कुटुंबातील सदस्य आपल्यावर नाराज होणार नाहीत, नेहमी खुश कसे राहतील, हा विषय देखील मुली Google वर सर्च करतात.

हे देखील वाचा IPL 2023: ती आली अन् पृथ्वीने मैदान मारलं; नाशिकच्या तरुणीने असं केलं सेलिब्रेशन, विजयानंतर पृथ्वीही गेला भेटायला..

Honda EM1 electric scooter: Honda ची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल; जाणून घ्या फीचर्स आणि वैशिष्ट्ये..

JioCinema: अखेर JioCinema चा ग्राहकांना दणका! आता JioCinema पाहण्यासाठी वर्षाकाठी मोजावे लागणार 999 रुपये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.