Honda EM1 electric scooter: Honda ची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल; जाणून घ्या फीचर्स आणि वैशिष्ट्ये..

0

Honda EM1 electric scooter: इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन, आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळल्या आहेत. अनेक दशकांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य केलेल्या होंडा मोटरसायकल कंपनीने आता आपली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल केली आहे. विशेष म्हणजे, होंडाने बाजारात दाखल दाखल केलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 48 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते.

वैशिष्ट्ये

होंडा कंपनीने आपली Honda EM1 ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल केली आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि दररोज कमी प्रवास करणाऱ्यांसाठी कंपनीने आपल्या बाईकची निर्मिती केली आहे. जर तुम्ही कामानिमित्त किंवा ऑफिससाठी नियमित 40,45 किलोमीटरचा प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी ही बाइक उत्तम आहे. जाणून घेऊया इलेक्ट्रिक स्कूटर विषयी सविस्तर तपशील.

Honda EM1 तपशील

इलेक्ट्रिक स्कूटर ची बॅटरी दमदार देण्यात आली आहे. म्हणजे या बॅटरी चे वजन केवळ 10.3 किलो देण्यात आले आहे. या बॅटरीमध्ये ग्राहकांना 1.47 kWh इतकी ताकद कंपनीकडून देण्यात आली आहे. सोबतच ही बॅटरी चार्ज करण्यासाठी कंपनीने 270W एसी चार्जर दिला आहे. ज्यामुळे बॅटरी कूल राहण्यास मदत होते.

सतत चार्जिंग पासून ग्राहकांची मुक्तता करण्यासाठी कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटर सोबत दोन बॅटरी देत आहे. महत्त्वाचं म्हणजे, एक बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ सहा तासांचा कालावधी लागतो. एका बॅटरीच्या चार्जिंगवर तुम्ही 48 किमी प्रवास करू शकता. जर तुम्ही दोन्ही बॅटरीचा वापर केला, तर जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करू शकता.

फीचर्स

होंडाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला 45 किलोमीटरचा वेग देण्यात आला आहे. एका तासामध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 45 किलोमीटर चा प्रवास करू शकते. याशिवाय कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले आहे. एवढेच नाही, तर पाठीमागील आणि पुढील चाकांना एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही चाकांना डिस्क ब्रेकची सुविधा देखील दिली आहे.

हे देखील वाचा JioCinema: अखेर JioCinema चा ग्राहकांना दणका! आता JioCinema पाहण्यासाठी वर्षाकाठी मोजावे लागणार 999 रुपये..

IPL 2023: ती आली अन् पृथ्वीने मैदान मारलं; नाशिकच्या तरुणीने असं केलं सेलिब्रेशन, विजयानंतर पृथ्वीही गेला भेटायला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.