Lion bull viral video: तिन्हीं सिंहांचा बैलाने केला व्हॉलीबॉल; एकदा व्हिडिओ पाहाच..

0

Lion bull viral video: सोशल मीडियावर (social media) प्राण्यासंदर्भातले (animal) नवनवीन व्हिडिओ (video) दररोज व्हायरल होत आहेत. सिंहाला (lion) जंगलाचा राजा का म्हटले जाते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सिंह आपल्या बलशाली ताकदीबरोबर बुद्धीचा देखील तितक्या चतुराईने वापर करतो. आणि म्हणूनच त्याच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न कोणताच प्राणी करत नाही. सिंहाला पाहताच आणि प्राणी आपली वाट बदलतात. (Lion bull viral video)

सिंहाने (lion) एखाद्या प्राण्याची शिकार करायचं ठरवलं, तर तो खाली हात जाईल तर नवलच. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तब्बल तीन सिंहांचा एका गव्याने करेक्ट कार्यक्रम केला. कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र सिंहाला गव्याच्या तावडीतील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

प्रेरणा देणारा व्हिडिओ

खरंतर हा व्हिडिओ प्रेरणादायी आहे. संकट कितीही मोठं असलं तरी देखील शेवटपर्यंत जर तुम्ही हार मानली नाही, तर तुमचा विजयही होऊ शकतो. हा संदेश देणार हा व्हिडिओ नक्कीच आहे. चहूबाजूंनी संकट आ वासून उभे असताना देखील गव्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश देखील आलं.

काय घडलं नेमकं? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक गवा तलाव ओलढताना दिसत आहेत. या संधीचा फायदा उठवत तीन सिंह त्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, तीन सिंहांनी चहुबाजूनी गव्याला घेरलं आहे. एवढेच नाही तर एका सिंहाने गव्याच्या पाठीमागे हल्ला देखील केला आहे.

मात्र सिंहापुढे गवा हार मानायला तयार होत नसल्याचे दिसत आहे. दोन सिंहांना आपल्या सिंगांनी धुडकावून बाजूला केल्याचं, या व्हिडिओत दिसत आहे. एका सिंहाने मात्र गव्याच्या पाठीमागे हल्ला केला असल्याने त्या सिंहाचा करेक्ट कार्यक्रम करायला गव्याला थोडी कसरत करावी लागली. मात्र अखेर गव्याने सिंहाच्या तावडीतून स्वतःला वाचवले. एवढेच नाही, तर सिंहाला आपल्या सिंगाने व्हॉलीबॉल प्रमाणे अनेकदा वर फेकल्याचं देखील दिसत आहे. अखेर सिंह कसाबसा जीव वाचवून पळून गेला.

हे देखील वाचा PM Kisan Yojana: योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज; या दिवशी जमा होणार चौदावा हप्ता..

Wedding Viral video: या किरकोळ कारणासाठी नवरीने वाजवली नवरदेवाच्या कानाखाली; पुढे जे घडलं ते कल्पणे पलिकडचे..

Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.