PM Kisan 15th Installment: या तारखेला जमा होणार पिएम किसान योजनेचा पंधरा हप्ता; तत्पूर्वी करावे लागणार हे काम..

0

PM Kisan 15th Installment: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी पीएम किसान योजनेची (PM Kisan Yojana) सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजाराचे १४ हप्ते केंद्र सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. आता पंधराव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र तत्पूर्वी काही बाबींची तरतूद करावी लागणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दर चार महिन्यांनी तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. देशातील लाखो बोगस शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर, केंद्र सरकारकडून ekyc प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकांच्या जमा केला जाणार आहे.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या. जर तुम्हाला देखील दोन हजाराचा हप्ता मिळत नसेल, तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. पिएम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याबरोबरच तुम्हाला 14 वा हप्ता देखील मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला ekyc प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जाणून घ्या सविस्तर..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना लगेच संबंधित बँक खाते आपल्या आधार कार्डशी लिंक करून घ्यावे लागणार आहे. सोबतच तुमच्या नावावर असणारा जमिनीचा सातबारा उताऱ्याची देखील नोंद तुम्हाला पीएम किसन योजनेच्या वेबसाईटवर जाऊन करावी लागणार आहे.

यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://pmkisan.gov.in/ असं सर्च करा. त्यानंतर ekyc हा पर्याय तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

जर तुम्हाला 14 वा हप्ता मिळाला नसेल, तरी देखील तुम्हाला तो का मिळाला नाही हे तपासता येणार आहे. त्यासाठी Know Your Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये काय अडथळा आला आहे, याविषयी माहिती मिळेल.

तुम्ही भरलेला अर्ज अचूक आहे की नाही, हे तुम्ही Know Your Status या पर्यायावर क्लिक करून पाहू शकता. बँक खाते, तुमचं नाव, लिंग, आधार कार्ड क्रमांक, जमिनीचा गट क्रमांक इत्यादी माहिती अचूक आहे की नाही, हे तपासून अर्ज दुरुस्त करा. वरील सर्व प्रोसेस व्यवस्थित केल्यानंतर, पंधरावा तुमच्या हप्ता बँक खात्यात जमा होण्यास कोणताही अडथळा येणार नाही.

याशिवाय लाभार्थी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण असेल तर तुम्ही pmkisan-ict@gov.in यावर मेल करू शकता.त्याचबरोबर 155261/ 1800115526 / 011-23381092 तीन पैकी एका टोल फ्री क्रमांक वर कॉल करून तुम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता.

हे देखील वाचा IND vs BAN World Cup 2023: तिसऱ्यांदा उलटफेर करण्यासाठी बांगलादेश सज्ज; या चार कारणामुळे बांगलादेश करू शकतो गेम..

SA vs NED: आफ्रिकेचा पराभव करत नेदरलँडने बिघडवलं सेमी फायनलचे गणित; कोणाला किती संधी? वाचा सविस्तर..

Train Ticket From Google Pay: या सोप्या पध्दतीने Google Pay वरून करा झटक्यात ट्रेनचं तिकीट बुक..

NTPC Recruitment 2023: या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.