Train Ticket From Google Pay: या सोप्या पध्दतीने Google Pay वरून करा झटक्यात ट्रेनचं तिकीट बुक..

0

Train Ticket From Google Pay: एकही रुपया जवळ नसताना तुम्ही एक रुपयांपासून लाखांपर्यंतचे व्यवहार करू शकता. डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून हे खूप सहज शक्य झालं आहे. आर्थिक व्यवहाराबरोबर आता तुम्ही ट्रेनचे तिकीट देखील गुगल पे वरून सहज बुक करून कन्फर्म करू शकता. जर तुम्हाला गुगल पे वरून ट्रेनचं तिकीट बुकिंग करता येत नसेल, तर आम्ही खूप सोप्या पद्धतीने याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

अनेक जण नोकरी निमित्त वेगवेगळ्या शहरात वास्तव्यासाठी असतात. अगदी अनेक जण परराज्यात देखील जॉब करतात. अशावेळी अचानकपणे घरी जायची वेळ आली किवा एखाद्या कार्यक्रम, सणासुदीला घरी जाण्यासाठी तुम्ही झटक्यात ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही अडथळ्या शिवाय अवघ्या एका मिनिटात ट्रेनचे तिकीट बुक करू शकता.

तात्काळ ट्रेनचे तिकीट (train ticket book) बुक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Google Pay ॲप ओपन करायचं आहे. गुगल पे ओपन केल्यानंतर, तुम्हाला Google Pay च्या सर्च बारमध्ये जाऊन “ConfirmTkt’ असं सर्च करायचं आहे.

त्यानंतर वेबसाईट ओपन होईल. त्याखाली “book train” हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे एक पेज ओपन होईल. त्यामध्ये वरच्या बाजूला तुम्हाला enter From, enter to या रकान्यामध्ये तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचं आहे, ते ठिकाण टाकायचे आहे.

enter From, enter to या रकान्यामध्ये तिन्ही कुठून कुठपर्यंत जायचं आहे, ते ठिकाण टाकल्यानंतर खाली तारीख सिलेक्ट करायची आहे. त्यांनतर “Search Train” या पर्यायावर क्लिक करा. त्यांनतर ट्रेन विषयी सगळी माहिती तुम्हाला समोरील रकान्यामध्ये पाहायला मिळेल. आता तुमच्या वेळेनुसार तुम्ही ट्रेन सिलेक्ट करू शकता.

नंतर तुम्हाला साइन इन करावे लागणार आहे. सायन केल्यानंतर तुम्हाला “Continue” या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. पुढे ज्या रकाण्यामध्ये माहिती मागितली जाईल, ती तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे. पुन्हा एकदा ट्रेन सिलेक्ट केल्यानंतर, तुम्हाला क्लास सिलेक्ट करावा लागणार आहे.

त्यांनंतर खाली रक्कम दिलेली असेल, सोबतच IRCTC खात्याची देखील माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. ती वेवस्थित भरा. त्यानंतर प्रवास करणाऱ्या व्यक्तीची माहिती भरा. मी भरलेली सर्व माहिती कंफर्म करून Continue या पर्यायावर क्लिक करा.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे मेथड निवडायचे आहे. तुम्ही पेमेंटचे मेथड निवडल्यानंतर, IRCTC पासवर्ड त्याचबरोबर कॅप्चा कोड टाका. त्यांनतर Submit या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे तिकीट बुक होऊन कन्फर्म झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल.

हे देखील वाचा NTPC Recruitment 2023: या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Dates benefits: पुरुष महिला दोघांसाठीही खजूर आहे वरदान; अशा प्रकारे खा, त्यासाठी मिळेल भरपूर ताकद..

World Cup 2023 semi-final scenario: सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला आणखी किती विजय आवश्यक? जाणून घ्या गणित..

AUS vs SL: अंपायरने LBW आऊट दिले, अन् डेव्हिड वॉर्नरने हासडली शिवी; व्हिडिओही झाला व्हायरल..

Flipkart sale: दमदार कॅमेरा, 8GB रॅम असणारे हे चार भन्नाट स्मार्टफोन Flipkart वर मिळतायत फक्त..

Saif Ali Khan: ..म्हणून त्यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या दोन गोळ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.