Flipkart sale: दमदार कॅमेरा, 8GB रॅम असणारे हे चार भन्नाट स्मार्टफोन Flipkart वर मिळतायत फक्त..

0

Flipkart sale: प्रत्येकाला कमी किमतीमध्ये दमदार स्मार्टफोन हवा असतो. प्रत्येक जण स्मार्टफोन खरेदी करताना कॅमेरा आणि रॅम या दोन गोष्टी लक्षात घेऊन स्मार्टफोनची खरेदी करतात. स्टोरेज साठी आता अधिक रॅमची आवश्यकता भासते. जर तुम्ही देखील दमदार कॅमेरा आणि आठ जीबी रॅम असणारा स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल, तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टने भन्नाट सेलचे आयोजन केलं आहे. जाणून घेऊया flipkart वर कमी किमतीमध्ये विकल्या जाणाऱ्या चार स्मार्टफोन विषयी..

फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या सेलमध्ये वीस हजारापेक्षा कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या काही स्मार्टफोन विषयी आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये अनेक दर्जेदार स्मार्टफोनचा समावेश आहे. अलीकडच्या काळात सॅमसंग या स्मार्टफोनकडे ग्राहकांची मोठी ओढ असल्याचे पाहायला मिळते. जर तुम्ही देखील सॅमसंगचा स्मार्टफोन विकत घेणार असाल, तर Samsung Galaxy A14 5G हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो.

Samsung Galaxy A14 5G हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्ट वर कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्ट वर हा smartphone तुम्हाला केवळ 19 हजार 999 रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. हा smartphone तुम्हाला 8 GB रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो.

या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.60 इंच असून ऑक्टाकोर एक्सीनोस 1330 चिपसेट देखील देण्यात आली आहे. 13MP फ्रंट कॅमेरा, तर बॅक 50MP+2MP+2MPअसा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये तब्बल 5000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.

Vivo Y56

सॅमसंग व्यतिरिक्त जर तुम्ही आणखी एक चांगला कॅमेरा आणि आठ जीबी रॅम असणारा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर Vivo Y56 हा बेस्ट पर्याय आहे. या स्मार्टफोनची किंमत Flipkart वर 19 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. या स्मार्टफोनला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. 6.58 इंच डिस्प्ले, 16MP फ्रंट कॅमेरा, तर 50MP + 2MP असा मेन ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Oppo A78

दमदार कॅमेरा, आठ जीबी रॅम, आणि 128 जीबी स्टोरेज असणारा स्मार्टफोन Flipkart वर केवळ अठरा हजार 999 रुपयेमध्ये विक्री होत आहे. Oppo A78 असं या स्मार्टफोनचे नाव आहे. 6.56 इंच डिस्प्ले, 8MP फ्रंट कॅमेरा, 50MP + 2MP असा ड्युअल रियर सेटअप बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच या फोनला 5000mAh बॅटरी दिली आहे.

Redmi Note 12 5G

फ्लिपकार्टवर Redmi Note 12 5G ha smartphone देखील डिस्काउंटमध्ये विक्री होत आहे. फ्लिपकार्टवर Redmi Note 12 5G हा smartphone 19499 रुपयात विक्री केला जात आहे. या स्मार्टफोनला 8 जीबी रॅम आणि तब्बल 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले देखील दमदार आहे. 6.67 इंच डिस्प्ले, फ्रंट कॅमेरा 13MP, 48MP + 8MP + 2MP असा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबतच 5000mAh बॅटरी देखील दिली गेली आहे.

हे देखील वाचा ENG vs AFG: इंग्लंडच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाला संजीवनी; जाणून घ्या कोण जाणार सेमीफायनलमध्ये..

Saif Ali Khan: ..म्हणून त्यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या दोन गोळ्या..

ICC World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचे World Cup 2023 मधील आव्हान संपुष्टात? जाणून घ्या सेमीफायनलचं गणित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.