ICC World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचे World Cup 2023 मधील आव्हान संपुष्टात? जाणून घ्या सेमीफायनलचं गणित..

0

ICC World Cup 2023: भारतामध्ये सुरू असलेली विश्वचषक 2023 (world Cup 2023) स्पर्धा आता रंगतदार अवस्थेत आली आहे. अपेक्षाप्रमाणे भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने विजय साकारत विजयी सलामी दिली. एकीकडे भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मात्र या विश्वचषकात धडपडताना पाहायला मिळत आहे.

पहिल्या दोन्हीं सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कर्णधाराने घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना केवळ 199 धावा करता आल्या.

पहिल्या पराभवा नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ या विश्वचषकात पुन्हा कमबॅक करेल, असं बोललं जात होतं. मात्र सलग दुसरा सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाला मोठा पराभवचा सामना करावा लागला. काल खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (AUS vs SA) सामन्यात ऑस्ट्रेलियाला तब्बल 134 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सलग दुसऱ्या दारून पराभवाबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या सेमी फायनलमध्ये पोचण्याच्या आशा आता पुसट झाल्या आहेत.

या विश्वचषकामध्ये प्रत्येक संघाला नऊ सामने खेळायचे आहेत. प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध खेळायचे असल्याने, ही स्पर्धा प्रचंड रंगतदार होणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला सहा विजयाची आवश्यकता असणार आहे. ज्या संघाकडे सहा विजयासह बारा गुण असतील, तो संघ सेमी फायनलचे तिकीट निश्चित करणार आहे. दहा गुणावर देखील एखादा संघ सेमी फायनमध्ये पोहचू शकतो. मात्र त्याला इतर संघाच्या रन रेट आणि गुणांवर अवलंबून राहावं लागणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाला मोठ्या पराभवचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला संघाला सहा विजय साकारणं अवघड झालं आहे. त्याचे कारण म्हणजे, न्यूझीलंड (New Zealand)  इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) संघाबरोबर ऑस्ट्रेलियाला सामने खेळायचे आहेत. या तिन्ही संघापैकी दोन्ही संघांनी ऑस्ट्रेलियाला जर पराभवाची धूळ चारली, तर मात्र त्यांचे सेमी फायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न भांगणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल, तर सात सामन्यात सहा विजय मिळवावे लागणार आहेत. आतापर्यंतचा खेळ पाहता ऑस्ट्रेलियाचा संघ हा कारनामा करेल, अशी शक्यता फार कमी आहे. सहा विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड अशा बलाढ्य संघांना पराभूत करावे लागेल.

ऑस्ट्रेलिया संघाला समजा पाच सामन्यात विजय साकारण्यात यश आलं, तर त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. इतर संघांचे रन रेट आणि गुण काय असतील, यावर ऑस्ट्रेलियाच्या सेमी फायनलचे गणित ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा खराब रन रेट असल्याने, दहा गुणांसह त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळणं जवळपास अशक्य मानलं जात आहे.

हे देखील वाचा 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.