ENG vs AFG: इंग्लंडच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाला संजीवनी; जाणून घ्या कोण जाणार सेमीफायनलमध्ये..

0

ENG vs AFG: भारतामध्ये सुरू असलेला विश्वचषक 2023 (world Cup 2023) आता रंगतदार अवस्थेत आला आहे. काल खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तान आणि इंग्लंड (England vs Afghanistan) सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या विश्वचषकात सर्वाधिक प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंडला अफगाणिस्तान कडून आश्चर्यकारक पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तान कडून झालेल्या पराभवामुळे इंग्लंडचे आता सेमी फायनलचे गणित अवघड झाले आहे. ते दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला मात्र संजीवनी मिळाली आहे. (World Cup 2023 semi-final scenario)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England and Australia) दोन संघाला 2023 च्या विश्वचषकात प्रबळ दावेदार मानला जातो. मात्र या दोन्ही संघांना दोनदा पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड संघाला काल अफगाणिस्तान संघाने पराभूत केल्याने, आता इंग्लंड संघासमोर सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचे मोठे आव्हान असेल. दुसरीकडे भारत, न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी सेमी फायनलमधील आपली जागा निश्चित केली आहे.

भारत-न्युझीलंड या दोन संघांनी आपले सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करत या स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे या तिन्ही संघांकडे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची मोठी संधी आहे. जर हे तीन संघ फारच खराब क्रिकेट खेळले तरच बाहेर जाऊ शकतात. अन्यथा हे तिन्ही संघ सेमी फायनलच्या शर्यतीमध्ये सर्वात पुढे आहेत.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान तीन संघांपैकी एकाच संघाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करता येणार आहे. तसं पाहायला गेलं तर या स्पर्धेतल्या दहाही संघांना अजूनही सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. सर्वाधिक चार संघांच्या शक्यतेचा विचार करायचा झाल्यास, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे तीन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया संघाला दोन सामन्यात दोन पराभव पहावे लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे गणित कठीण झाले होते. तर काल अफगाणिस्तान संघाने इंग्लंड संघाला धूळ चालल्याने, आता ऑस्ट्रेलियाला इंग्लडपेक्षा अधिक जास्त संधी आहे. ऑस्ट्रेलिया संघाला दक्षिण आफ्रिका आणि भारताने पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलिया दोन्ही बलाढ्य संघाकडून पराभूत झाला. मात्र इंग्लंडचा अफगाणिस्तान कडून पराभूत झाल्याने, त्यांना ऑस्ट्रेलिया पेक्षा अधिक पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीनही संघांकडून इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला, तर इंग्लंड सेमीफायनलमध्ये पोहोचू शकणार नाही. आतापर्यंत इंग्लंडचा खेळ पाहिला तर याची दाट शक्यता देखील आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामधील 4 नोव्हेंबरला होणार सामना हा या स्पर्धेतील चौथा सेमीफायनलिस्ट कोण असणार? हे स्पष्ट करणारा सामना ठरण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा ODI World Cup 2023: या दोन संघांना रोखणं अवघड; world Cup 2023 च्या फायनलचे प्रबळ दावेदार..

ICC World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचे World Cup 2023 मधील आव्हान संपुष्टात? जाणून घ्या सेमीफायनलचं गणित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.