ODI World Cup 2023: या दोन संघांना रोखणं अवघड; world Cup 2023 च्या फायनलचे प्रबळ दावेदार..
ODI World Cup 2023: भारतामध्ये विश्वचषक होत असल्याने भारतीय संघाच्या कामगिरीकडे अनेकांचं विशेष लक्ष आहे. विश्वचषक (world Cup 2023) भारतात होत असल्याने, भारतीय संघ या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार देखील मानला जात आहे. भारतीय संघाने विश्वचषकात सुरुवात देखील दमदार केली. मात्र आता भारत नाही, तर या दोन संघांना रोखणं अवघड असून, या विश्वचषकाचे दोन्ही प्रबळ दावेदार देखील असल्याचं क्रिकेट दिग्गजांनी म्हंटले आहे.
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) हे दोन संघ प्रबळ दावेदार असतील, असं अनेक क्रिकेट दिग्गजांनी प्रेडिक्शन केलं होतं. भारतीय संघ प्रबळ दावेदार असला तरी सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पराभूत देखील होण्याची शक्यता असल्याचं मत अनेकांनी नोंदवलं. सेमी फायनलध्ये भारतीय संघ दबावाला झेलू शकला नाही, तर भारतीय संघाला सेमी फायनलमध्येच आपल्या आशा गुंडाळावा लागू शकतात.
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघाला प्रबळ दावेदार म्हटलं जात होतं. मात्र सुरुवातीलाच या दोन्ही संघांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. ज्याप्रकारे या दोन्ही संघांना पराभवाची चव चाखायला लागली, हे पाहता आता या दोन्ही संघांना क्रिकेट दिग्गजांनी प्रबळ दावेदाराची यादीतून बाहेर काढले आहे.
वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार सुरुवात करणाऱ्या दोन्हीं संघाला प्रबळ दावेदारीच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्युझीलंड या दोन्ही संघांनी दमदार खेळ सादर करत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रबळ दावेदार संघांचा दारुण पराभव करत अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
इंग्लंड विरुद्ध खेळताना न्यूझीलंड संघाने एकहाती विजय मिळवत 2019 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत तयारीने उतरल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड संघाने न्युझीलंड समोर ठेवलेले 282 धावांचे आव्हान न्युझीलंड संघाने केवळ 36.2 षटकात 1 गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.
दुसरीकडे या स्पर्धेचा दुसरा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची देखील यापेक्षा वेगळी अवस्था झाली नाही. भारता विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी कोलमडली. याचीच पुनरावृत्ती दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या कालच्या सान्यात देखील पाहायला मिळाली. भारता विरुद्ध 199 तर दक्षिण आफ्रिके विरुद्ध 177 धावांत ऑस्ट्रेलिया संघ गडगडला.
ज्या पद्धतीने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने आपल्या खेळाचे प्रदर्शन केलं. हे पाहता आता हे दोन्ही संघ या वर्ल्ड कपमध्ये प्रबळ दावेदार असतील. असं अनेक क्रिकेट दिग्गजांनी म्हंटल आहे. यामध्ये वीरेंद्र सेहवागचा देखील समावेश आहे.
हे देखील वाचा ICC World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचे World Cup 2023 मधील आव्हान संपुष्टात? जाणून घ्या सेमीफायनलचं गणित..
IND vs PAK: उद्या पाकिस्तान विरुद्ध Shubman Gill खेळणार? टीम मॅनेजमेंटने केले स्पष्ट..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम