IND vs PAK: उद्या पाकिस्तान विरुद्ध Shubman Gill खेळणार? टीम मॅनेजमेंटने केले स्पष्ट..

0

IND vs PAK: अपेक्षाप्रमाणे भारतीय संघाने या विश्वचषकात (world Cup 2023) दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय संपादन करत विजयी सलामी दिली. भारताने सलग दोन सामन्यात दोन विजय साकारले. असं असलं तरी जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या शुभमन गिलला (Shubman Gill) मात्र भारतीय संघाच्या अंतिम 11 मधून बाहेर बसावं लागलं. पहिल्या दोन सामन्यात शुभमन गिलची उणीव भासली नाही. मात्र उद्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलची उणीव भासण्याची शक्यता आहे.

डेंग्यू (Dengue) झाल्यामुळे शुभमन गिलला पहिल्या दोन सामनासाठी भारतीय संघाचा भाग होता आलं नव्हतं. डेंग्यू मधून शुभमन गिल आता बारा झाला असून, त्याने काल एक तास नेटमध्ये सराव देखील केला. भारतीय संघासाठी शुभमन गिल खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. सलामीवीर म्हणून, त्याने आतापर्यंत दमदार खेळाचे प्रदर्शन केले आहे. आतापर्यंत त्याने 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने जवळपास 67 च्या सरासरीने 1,917 धावा केल्या आहेत.

कधी झाला होता डेंग्यू

शुभमन गिल गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. साहजिकच भारतीय संघासाठी तो खूप महत्वाचा खेळाडू आहे. शुभमन गिल देखील आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळत असल्याने, तो ही कमालीचा उत्सुक आहे. मात्र 6 ऑक्टोंबरला त्याला डेंग्यूची लागण झाली.

डेंग्यू झाल्यानंतर, तो पूर्णपणे बरा होण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. डेंग्यू झाल्यानंतर, खूप मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवतो. तो पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी किमान 12 ते 15 दिवसाचा कालावधी हवा. त्यामुळे आता तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात देखील मुकण्याची शक्यता आहे. हॉस्पिटल मधून शुभमन गिलला डिस्चार्ज मिळाला असला तरी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयी अद्यापही अधिकृतरीत्या स्पष्टता झाली नाही.

काल शुभमन गिलने भारतीय संघासोबत एक तास सराव केला. शुभमन गिलने सराव केल्यामुळे तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. मात्र टीम मॅनेजमेंट कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान विरुद्ध पुन्हा एकदा रोहित शर्मा बरोबर ईशान किशन सलामीला येणार असल्याची माहिती आहे. मात्र यावर देखील अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले नाही.

हे देखील वाचा ICC World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचे World Cup 2023 मधील आव्हान संपुष्टात? जाणून घ्या सेमीफायनलचं गणित..

Acharya Chanakya Niti: या तीन ठीकणी पैसे खर्चास कंजुषी केल्यास लक्ष्मी राहते नेहमी नाराज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.