Acharya Chanakya Niti: या तीन ठीकणी पैसे खर्चास कंजुषी केल्यास लक्ष्मी राहते नेहमी नाराज..

0

Acharya Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे थोर विद्वान होते. मानवाच्या कल्याणकारी अनेक मूल्ये त्यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रंथामध्ये लिहून ठेवली आहेत. ज्याच्यामुळे मानवाचे जीवनमान सुखकर आणि आनंददायी बनवलं आहे. मात्र त्यासाठी आचार्य चाणक्याने सांगितलेली नीती तुम्हाला आत्मसात करावी लागते. आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) आपल्या चाणक्य नीति (Chanakya niti) या ग्रंथामधून नातेसंबंध, धर्म, अर्थकारक, आणि कर्तव्य या सगळ्या गोष्टीवर भाष्य केलं आहे.

आयुष्यामध्ये प्रत्येकाला धन संपत्ती मोठ्या प्रमाणात हवी असते. त्यासाठी अनेक जण दिवस रात्र मेहनत देखील करतात. मात्र प्रत्येकाला हे शक्य होत नाही. संपत्ती जमवण्यासाठी अनेक जण आयुष्यामध्ये प्रचंड काटकसर करतात. आचार्य चाणक्य यांनी याविषयी भाष्य केले आहे. काटकसर करणं हा चांगला गुण आहे. मात्र काही ठिकाणी काटकसर केल्यास ती तुमच्यासाठी नुकसानदायक आहे.

आचार्य चाणक्य सांगतात, काटकसर चांगला गुण आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी याचा लाभच मिळेलच असं नाही. अनेक ठिकाणी तुम्हाला मोकळ्या हाताने पैसे खर्च करावे लागतात. आचार्य चाणक्य सांगतात, जीवनामध्ये जितकं अधिक शक्य होईल, तितके अन्नदान करणे आवश्यक आहे. अन्नदान केल्यामुळे लक्ष्मीची कृपा राहते. आणि तुमच्या संपत्तीत भरभराटी येते.

आचार्य चाणक्य सांगतात, मनुष्याकडे लोभ असता कामा नये. लोभामुळे मनुष्य अन्याय आणि अत्याचाराचा मार्ग स्वीकारतो. रोगामुळे वाईट कृत्यांकडे मनुष्याचे लक्ष जात नाही आणि तो असंख्य पापे करत जातो. त्यामुळे नेहमी लोकांना मदत करणे आवश्यक आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला वास्तवाची जाण राहते. लोकांना मदत केल्याने लक्ष्मीची कृपा सदैव मनुष्यावर राहत असल्याचं चाणक्य सांगतात.

चाणक्य सांगतात, अनेक कल्याणकारी संस्था आणि धार्मिक स्थळांना मदत करणे आवश्यक आहे. धार्मिक स्थळांना आणि संस्थांना मदत केल्याने, तुम्ही दयावान बनता. लोकांच्या भावनांची तुम्हाला जाणीव होते. या तीन ठिकाणी जर तुम्ही काटकसर केली नाही, तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहते आणि तुमच्या जीवनामध्ये भरभराटी येते.

हे देखील वाचा IND vs AUS World Cup Match: एकच पराभव आणि पुन्हा त्याच समस्या उजागर; ते तिन्हीं फलंदाज अपयशी ठरल्याने आता World Cup प्लेइंग 11 चा रस्ता झाला साफ..

Redmi Note 13: 100MP कॅमेरा असलेला Redmi चा तगडा फोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..

peanut chikki recipe: तुम्ही देखील खाता बाहेरची शेंगदाणा चक्की? शेंगदाणा चक्की बनवण्याची पद्धत पाहून पुन्हा तुम्ही हातही लावणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.