peanut chikki recipe: तुम्ही देखील खाता बाहेरची शेंगदाणा चक्की? शेंगदाणा चक्की बनवण्याची पद्धत पाहून पुन्हा तुम्ही हातही लावणार नाही..

0

peanut chikki recipe: आपल्या देशात बाहेरचे पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बाहेरचे पदार्थ कसे बनतात? याविषयी फार विचार न करता, दररोज अनेकजण मोठ्या प्रमाणात बाहेरचे पदार्थ खातात. मात्र बाहेरचे पदार्थ कसे बनतात? हे जाणून न घेता अनेकजण बाहेरच्या पदार्थांना पसंती देतात. शेंगदाणा चक्की हा पदार्थ देखील जवळपास सगळ्यांनीच खाल्ला असेल. पण जर तुम्ही देखील शेंगदाणा चक्की खात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

पान टपरी, छोटी दुकाने यामध्ये मोठ्या प्रमाणात शेंगदाणा चक्की विक्री केली जाते. प्राथमिक शाळा, हायस्कूल जवळ शेंगदाणा चिक्कीला लहान मुलांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु जर तुम्ही शेंगदाणा चक्की बनवण्याची पद्धत पाहिली, तर तुम्ही पुन्हा शेंगदाणा चक्कीला हात देखील लावणार नाही.

सध्या सोशल मीडियावर शेंगदाणा चिक्की बनवताना एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड किळसवाणा आहे. शेंगदाणा चिक्की बनवण्याची प्रोसेस खाली फरशीवर केली जात आहे. विशेष म्हणजे, फरशी देखील अस्वच्छ आहे. फरशीवर बसलेल्या तरुणांच्या पायामध्ये स्वच्छता राखण्यासाठी काहीही नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, काही तरुण फरशीवर बसलेले आहेत. फरशीवर बसले असताना, चक्कीचा लेप पायाजवळ आहे. अगदी पायाला देखील चिटकत आहे. चौकोनी आकाराची एक पट्टी आहे. ज्यात गूळ आणि शेंगदाण्याचा लेप ठेवला जात आहे. चौकोनी पट्टी केवळ चारी बाजूने आहे. पट्टीच्या वरती आणि खाली दोन्ही बाजूंनी काहीच नाही.

चौकोन आकाराच्या पट्टीत गुळ आणि शेंगदाण्याचा लेप टाकल्यानंतर, तो थेट खाली फरशीला जाऊन चिटकत आहे. शेंगदाणा आणि गुळाचा चौकोनी आकाराचा लेप तयार झाल्यानंतर, तो पुन्हा फरशीवरुनच सरकवला जात आहे. शेंगदाणा आणि गुळाचा लेप फरशीवर अनेकदा आपटला देखील जात आहे. चक्की बनवण्याचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर, पुन्हा शेंगदाणा चिक्की खाण्याची अनेकांची इच्छा देखील होणार नाही.

हे देखील वाचा robbery viral video: चोरी करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर गेला अंगावरून, तरीही बहाद्दराने केले ते काम; पाहा काळजाचा ठोका चुकणारा व्हिडिओ..

Ravichandran Ashwin: अजित आगरकर फक्त नावाला, टीम रोहितच निवडतो; निवडीनंतर अश्विनच्या त्या वक्तव्यामुळे नवा वाद..

IND vs AUS: थाटात जिंकलो, पण त्या नव्या पेचाने रोहित शर्मा, राहुल द्रविडची झोप उडवली..

WhatsApp Channel Create: या पद्धतीने तयार करा WhatsApp Channel; आणि एकाचवेळी लाखो लोकांना मेसेज पाठवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.