IND vs AUS: थाटात जिंकलो, पण त्या नव्या पेचाने रोहित शर्मा, राहुल द्रविडची झोप उडवली..

0

IND vs AUS: भारतीय संघाने (Indian team) काल ऑस्ट्रेलियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच विकेट राखून दमदार विजय संपादन केला. गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर भारतीय सलामीवीर आणि सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) आणि केएल राहुलने (KL Rahul):केलेल्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाने विजय मिळवला. मात्र या विजयाबरोबरच आता नवा पेज निर्माण झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघ डिफेन्सिव्ह अप्रोच घेऊन मैदानात उतरतो. असा आरोप सातत्याने होत आहे. एक एक्स्ट्रा बॅट्समन म्हणून भारतीय संघ ऑल राऊंडर खेळाडूला भारतीय संघात स्थान दिले जात आहे. अनेक क्रिकेट दिग्गज मात्र या धोरणा विरोधात आहेत.

भारतीय संघाला जर आठव्या क्रमांकावर देखील फलंदाजी करणारा खेळाडू हवा असेल, तर भारतीय टीम खूपच बचावात्मक पवित्रा घेऊन मैदानात उतरत आहे. जर आठव्या क्रमांकावर देखील फलंदाजी करणारा खेळाडू हवा असेल, तर याचा अर्थ वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंवर तुमचा विश्वास नाही हे सिद्ध होतं.

एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याच्या नादात दमदार फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद शमीला भारताच्या प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर ठेवावं लागत आहे. अनेकांनी या निर्णयावर जोरदार फटकार देखील लगावली आहे. भारतीय संघाला तीस-पस्तीस धावा करणारा फलंदाज हवा आहे, की अपोजिट संघाचे पाच गडी बाद करणारा गोलंदाज हवा आहे? हा प्रश्न आता सुनील गावस्कर आकाश चोप्रासह अनेकांनी उपस्थित केला आहे.

मोहम्मद शमीने (Mohammed Shami) काल दमदार खेळाचे प्रदर्शन करत, ऑस्ट्रेलिया संघाचे प्रमुख पाच फलंदाज तंबूत धाडले. शमीने केलेल्या दमदार खेळामुळे आता त्याला भारताच्या प्लेइंग मधून बाहेर बसवलं जाणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शमीने केलेल्या दमदार खेळामुळे आता भारतीय संघ मॅनेजमेंट आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

शमी जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने, त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर बसवणं अवघड आहे. त्यामुळे आता विश्वचषक संघासाठी निवडल्या जाणाऱ्या अंतिम अकरामध्ये शमीला स्थान द्यावं लागणार आहे. साहजिकच त्यामुळे आता शार्दुल ठाकूरला बाहेर बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, आणि मोहम्मद सिराज हे तीन जलदगती गोलंदाज हार्दिक पांड्या ऑल राऊंडर, रवींद्र जडेजा कुलदीप यादव हे दोन स्पिनर असा गोलंदाजी अटॅक घेऊन भारतीय संघाला आपली अंतिम 11 निवडावी लागणार आहे. मात्र यामुळे एक फलंदाज कमी होणार आहे. हा मोठा पेच आता कर्णधार रोहीत शर्मा आणि राहुल द्रविड पुढे निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा BSNL Recharge plan: Jio Airtel चा उठला बाजार; BSNL देतंय 400 रुपयांत तीन महिने दररोज 2GB data, वाचा सविस्तर..

Ravichandran Ashwin: अजित आगरकर फक्त नावाला, टीम रोहितच निवडतो; निवडीनंतर अश्विनच्या त्या वक्तव्यामुळे नवा वाद..

IND vs AUS 1st ODI: सूर्या, तिलक वर्माला मिळणार का संधी? जाणून घ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या ODI साठी भारतीय संघ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.