IND vs AUS 1st ODI: सूर्या, तिलक वर्माला मिळणार का संधी? जाणून घ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या ODI साठी भारतीय संघ..

0

IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज मोहलीच्या (mohali) मैदानावर होणार आहे. दुपारी दीड वाजल्यापासून हा सामना क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे. विश्वचषकापूर्वी केवळ तीनच सामने भारत खेळणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

पहिल्या दोन सामन्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव या चौघांना विश्रांती देण्यात आली आहे. चौघांच्या उपस्थितीत भारतीय संघाची अंतिम अकरा कशी असेल, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. टी-ट्वेंटी स्टार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माला (Tilak Varma) भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का? जाणून घेऊया, पहिल्या सामन्यासाठी भारताची अंतिम 11..

केएल राहुलच्या (kl Rahul) नेतृत्वाखाली भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर रवीचंद्रन अश्विनचे (ravichandran Ashwin) भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. कुलदीप यादवच्या अनुपस्थित अश्विनचा भारताच्या अंतिम 11 मध्ये समावेश करण्यात येणार आहे. रवीचंद्रन अश्विनची निवड केवळ ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठीच करण्यात आली नाही. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे त्याची विश्वचषक संघात निवड करण्यात येणार आहे. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध अश्विन कशी कामगिरी करतो यावर सर्वकाही अवलंबून आहे.

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याविषयी देखील भाष्य केलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवला (suryakumar Yadav) पहिल्या दोन सामन्यात संधी देण्यात येणार असल्याचे राहुल द्रविडने म्हंटले आहे. सूर्यकुमार यादव आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू असल्याचं त्यांनी म्हटले.

आशिया चषक स्पर्धेत (asia Cup) ईशान किशनने मधल्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाकिस्तान विरुद्ध दमदार खेळ केला. मात्र त्याला आता मधल्या क्रमांकात फलंदाजी करण्याची संधी मिळणार नसल्याने, तो शुभमन गिलसोबत सलामीला येणार असल्याची शक्यता आहे. मधल्या क्रमांकाची जबाबदारी केएल राहुल, श्रेयस अय्यर (shreyas Iyer) सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा पार पाडतील.

असा आहे पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ..

शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

हे देखील वाचा Ravichandran Ashwin: अजित आगरकर फक्त नावाला, टीम रोहितच निवडतो; निवडीनंतर अश्विनच्या त्या वक्तव्यामुळे नवा वाद..

ODI World Cup 2023: वर्ल्ड कप मधील पाकिस्तानचा सामना होणार प्रेक्षकांवीणा; प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्याचे कारणही BCCI ने केले स्पष्ट..

WhatsApp Channel Create: या पद्धतीने तयार करा WhatsApp Channel; आणि एकाचवेळी लाखो लोकांना मेसेज पाठवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.