WhatsApp Channel Create: या पद्धतीने तयार करा WhatsApp Channel; आणि एकाचवेळी लाखो लोकांना मेसेज पाठवा..
WhatsApp Channel Create: व्हाट्सअप (WhatsApp) हे केवळ मेसेजिंग ॲप (massaging app) राहिले नाही. व्हाट्सअपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय देखील उभा करू शकता. व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन पिक्चर्स घेऊन येत असतं. WhatsApp ने नुकतंच आपलं व्हाट्सअप चॅनेल हे फीचर्स WhatsApp Channel feature) लॉन्च केले. या फिचर्समुळे ग्राहकांना आता लाखो लोकांसोबत एकाच वेळी जुडण्याची संधी मिळणार आहे. (WhatsApp Channel feature)
व्हाट्सअपने लॉन्च केलेले व्हाट्सअप चॅनेल हे फीचर्स एकूण 150 देशांमध्ये सादर केले गेले आहे. वापरकर्त्यांना आता व्हाट्सअप चॅनलच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना कनेक्ट होण्याची मिळणार आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील व्हाट्सअप चॅनलच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राखू शकणार आहेत. जाणून घेऊया, व्हाट्सअप चॅनल हे फीचर्स कसं काम करेल, आणि व्हाट्सअप चॅनल काढण्यासाठी काय प्रोसेस आहे.
असं काम करेल WhatsApp channel फिचर्स
व्हाट्सअप चॅनेल फीचर्स कसं काम करले याविषयी जाऊन घेऊ. कुठलाही व्हाट्सअप वापरकर्ता आपला आवडता चॅनल काढू शकतो. आपल्याचॅनलच्या माध्यमातून तो एकाच वेळी लाखो लोकांना संदेश पाठवू शकतो. आपल्या प्रॉडक्ट विषयी माहिती देखील तो या व्हाट्सअप चॅनलच्या माध्यमातून एकाच वेळी लाखो लोकांना देऊ शकतो.
सगळयात महत्त्वाचं म्हणजे, व्हाट्सअप चॅनल काढताना तुम्हाला मोबाईल नंबरची आवश्यकता नसणार आहे. याशिवाय व्हाट्सअप चॅनलमध्ये समाविष्ट होणाऱ्या सदस्यांची देखील माहिती या ठिकाणी गुप्त ठेवली जाणार आहे. व्हाट्सअप चॅनल फीचर्समध्ये समाविष्ट होणाऱ्या सदस्यांना मात्र चॅटिंग करता येणार नाही. हे फीचर्स एकतर्फी संभाषण प्रसारित करणारं आहे.
असा सुरू करा व्हाट्सअप चॅनल..
जर तुम्हाला देखील तुमचा बिजनेस एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तुम्हाला व्हाट्सअप चॅनल हे खूप प्रभावी माध्यम ठरणार आहे. चॅनल काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं व्हाट्सअप अपडेट करायचा आहे. व्हाट्सअप अपडेट केल्यानंतर, तुम्हाला chat, update आणि ‘call‘ हे तीन पर्याय पाहायला मिळतील. यापूर्वी update या पर्याया ऐवजी satus हा पर्याय पहिला मिळत होता.
update या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, खाली डाव्या बाजूला “find channel” हा पर्याय पाहायला मिळेल. “find channel” या पर्यायासमोर तुम्हाला + हे आयकॉन दिसेल. ज्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला “create your channel” हा पर्याय दिसेल.
“create your channel” वर क्लिक करून तुम्ही तुमचा आवडता चॅनेल सुरू करू शकता. find channel” या पर्याया समोर जर + हे आयकॉन नसेल, तर मात्र हे फीचर्स तुमच्यासाठी अजून उपलब्ध करण्यात आले नाही. मात्र पुढच्या आठवड्यात WhatsApp च्या प्रत्येक युजर्स करिता ही सुविधा देण्यात येणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम