Shubman Gill Relationship: दोघांचं ब्रेकअप झालं, आता तिने गिलला इंस्टाग्रामवर फॉलोही केलं आणि..; पाहा दोघांच्या नात्याचं स्टेट्स..

0

Shubman Gill Relationship: सलामीवीर म्हणून संधी मिळाल्यानंतर शुभमन गिल (shubman gill) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाकडून खेळताना शुभमनने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दमदार खेळाचे प्रदर्शन केले आहे. खूप कमी काळात शुभमन कमालीचा लोकप्रिय फलंदाज म्हणून समोर आला आहे. फक्त खेळामुळेच नाही, तर शुभमन आपला फिटनेस, आणि रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असतो. (Shubman Gill Sara Tendulkar Relationship)

क्रिकेटच्या मैदानावर शुभमन गिल ज्या प्रकारे चौकशी फटकेबाजी करतो. त्याच पद्धतीने मैदानाच्या बाहेर देखील तो आपल्या प्रेमाचे रंग उधळताना दिसतो. आता पुन्हा एकदा त्याच्या रिलेशनशिप विषयीची चर्चा बाहेर आली आहे. शुभमन आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षापासून सुरू होत्या. काही महिन्यांपूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्या.

मात्र आता दोघांच्या रिलेशनशिप विषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सारा तेंडुलकर हिने शुभमन गिलची बहिण शाहनील गिलला इंस्टाग्रामवर फॉलो केलं आहे. यामुळे आता दोघांमध्ये पुन्हा पॅचअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सारा तेंडुलकर देखील सोशल मीडियावर कमालीची ॲक्टीव आहे. अधिकृतरित्या शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर या दोघांनी आम्ही अनेकमेकांना डेट करत असल्याचे जाहीर केले नाही. मात्र शुभमन गिलची बहिण शाहनील गिलला इंस्टाग्रामवर साराने फॉलो केलं असल्याने या चर्चा रंगल्या आहेत.

शुभमन गिल आणि सारा अली खान हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं. एका कार्यक्रमात शुभमन गिलला are you dating Sara? असं विचारण्यात आले होते. त्यावर शुभमन म्हणाला होता, may be.. गिलच्या या उत्तरामुळे तो साराला डेट करत असल्याच्या चर्चा आणखीन गडद झाल्या. मात्र अधिकृतरित्या शुभमन गिलच्या रिलेशनशिप विषयी कोणतीही माहिती नाही.

हे देखील वाचाBabar Azam: Asia Cup मधून बाहेर होताच पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा; ..म्हणून बाबर शाहीन आफ्रिदी एकमेकांना भिडले; पाहा व्हिडिओ..

IND vs SL Asia Cup final: एवढा माज बरा नाही..! गिलने ती मागणी करताच रोहित म्हणाला, अजिबात नाही, मूर्ख आहेस का; पाहा व्हिडिओ..

IND vs SL Asia Cup 2023 Final: फायनलसाठी राखीव दिवस नाही, उद्या सामना रद्द होण्याची शक्यता; सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी..

Asia Cup 2023 Final: भारताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारला! श्रीलंकेला पराभूत करणं आता अशक्य; जाणून घ्या फायनलचं गणित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.