Asia Cup 2023 Final: भारताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारला! श्रीलंकेला पराभूत करणं आता अशक्य; जाणून घ्या फायनलचं गणित..

0

भारत आणि श्रीलंका (IND vs SL Asia Cup 2023 Final) यांच्यामध्ये उद्या रविवारी आशिया चषक स्पर्धेची ?Asia Cup 2023) फायनल खेळवली जाणार आहे. अनेकांना धक्का देत आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. पाकिस्तान संघाला धूळ चारून श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. केवळ पाकिस्तान संघालाच नाही, तर भारतीय संघाची देखील श्रीलंकेने दमछाक केली. (IND vs SL Asia Cup 2023 Final)

काल खेळलेल्या सामन्यात बांगलादेश संघाने भारतीय संघाला धूळ चारली. भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच बदल केले. ज्या खेळाडूचा विश्वचषकाच्या संघात समावेश नाही, त्यालाही संधी देण्यात आली. यावरून आता कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीम मॅनेजमेंटवर टीका होत आहे.

विराट कोहली (Virat Kohli) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना विश्रांती देण्यात आली. मात्र आता कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटला हा निर्णय महागात पडणार असल्याचं बोललं जातंय. खास करून विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला विश्रांती देण्याच्या निर्णयाचा मोठा फटका भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या फायनलच्या सामन्यात बसण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय संघाच्या प्रमुखांना बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सराव करण्याची चांगली संधी होती. मात्र टीम मॅनेजमेंटने ही संधी गमावली. बांगलादेश संघात दर्जेदार स्पिनर होते. भारतीय फलंदाज गेल्या काही वर्षापासून फिरकी फिरकीपटूंना खेळताना चाचपडताना पाहायला मिळतात. बांगलादेश विरुद्ध स्पिन खेळण्याचा सराव देखील झाला असता. याचा फायदा अर्थातच फायनलच्या सामन्याचा झाला असता.

दुसरीकडे श्रीलंकेच्या जमींच्या बाजूंचा विचार करायचा झाल्यास, हा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका संघाच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळते. त्यांनी बांगलादेश, पाकिस्तान संघाला धूळ चारली. भारताची देखील दमछाक केली. श्रीलंकेचे फलंदाज आणि फिरकीपटू जबरदस्त कामगिरी करत आहेत. भारत विरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे आणि पाकिस्तान संघाचा पराभव केल्याने श्रीलंका संघाचा आत्मविश्वास देखील द्विगुणित झाला आहे.

भारतीय संघाच्या कामगिरीत मात्र सातत्याचा अभाव आहे. उद्या भारतीय संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची शक्यता अधिक आहे. श्रीलंका मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची शक्यता आहे. दोन्हीं कर्णधारांपैकी टॉस कोणीही जिंकला तरी भारतीय संघाची प्रथम फलंदाजी येणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे. जर भारतीय संघाला 250 पेक्षा जास्त संख्या उभारता आली नाही, तर श्रीलंकेचा संघ बाजी मारण्याची दाट शक्यता आहे.

हे देखील वाचा MS Dhoni Bike Riding Video: किती तो साधेपणा, रस्त्याने जाताना चक्क धोनीने तरुणाला दिली टू-व्हीलरवर लिफ्ट; पाहा व्हिडिओ.

Benefits of Raisins: तुम्हीही खाताय मनुके? मग हे एकदा वाचाच..

Rekha Viral video: ..म्हणून सेल्फी मागायला गेलेल्या चाहत्यांच्या रेखाने वाजवली कानाखाली; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.