Rekha Viral video: ..म्हणून सेल्फी मागायला गेलेल्या चाहत्यांच्या रेखाने वाजवली कानाखाली; पाहा व्हिडिओ..

0

Rekha Viral video: अनेक बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रिटींची आजही मोठी क्रेझ पाहायला मिळते. रेखा (rekha) हे त्यापैकीच एक नाव आहे. आजही रेखाचे मोठी फॅन फॉलोविंग आहे. अदाबरोबर रेखाचे सौंदर्य देखील अनेकांना भुरळ पाडून जातं. रेखाचे वय 68 आहे. मात्र आजही ती कमालीची तरुण दिसते. रेखा अनेकदा एअरपोर्टवर स्पॉट झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. रेखाचा आपल्या चाहत्या सोबतचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल (viral video) झाला आहे.

चाहते आपल्या आवडत्या कलाकारांसोबत सेल्फी, autograph घेण्यासाठी नेहमी धडपड करताना तुम्ही पाहिले असेल. रेखा सोबत देखील हा प्रकार एका एअरपोर्टवर घडला आहे. रेखा सोबत सेल्फी काढण्यासाठी एक चाहता धरपड करत असल्याचं रेखा पाहते. आणि त्याच्या आयुष्यात कधीही न येणारा क्षण तो अनुभवतो.

एअरपोर्टवर रेखाला साडीमध्ये पाहून काही पत्रकार फोटो काढू लागले. रेखा देखील त्यांना नाराज न करता पोझ देऊ लागली. इतक्यात एक लाल रंगाचा टी-शर्ट घालून चाहता सेल्फी काढण्यासाठी धडपड करत असल्याचे रेखाने पाहिले. चाहत्याला आपल्यासोबत सेल्फी हवी आहे हे लक्षात आल्यानंतर, रेखा चाहत्याकडे गेली.

चाहत्याची सेल्फी काढण्याची मागणी रेखाने मान्य केली. मात्र सेल्फी काढल्यानंतर, रेखाने त्याच्या कानाखाली वाजवली. जवळ असणाऱ्या अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र रेखाने चाहत्याच्या कानाखाली प्रेमाने लगावली. रेखाचे हे प्रेमळ कृत्य पाहून अनेकांना धक्का बसला. अनेकदा रेखा आपल्या चाहत्यांसोबत खूप प्रेमाने भेटल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ फारच प्रेमळ आणि मजेशीर आहे. चाहत्याला सेल्फी दिल्यानंतर, त्याच्या खांद्यावर देखील रेखाने हात ठेवला. आणि अखेर प्रेमाने त्याच्या गालावर हळुवारपणे एक चापट देखील मारली. रेखाच्या या कृत्याचे सोशल मीडियावर आता तोंडभरून कौतुक होत आहे.

हे देखील वाचा India vs Bangladesh: भारत फायनल जिंकणार की नाही? आजचा सामनाच ठरवणार..

Asia Cup Final 2023: चहलची कारकीर्द संपुष्टात? मी कर्णधार असे पर्यंत तू संघाबाहेर..” हे काय बोलून गेला रोहित शर्मा..

Benefits of Raisins: तुम्हीही खाताय मनुके? मग हे एकदा वाचाच..

PAK vs SL: दोन्हीं संघांनी 252 धावाच केल्या, मग श्रीलंकेला का विजयी घोषित केले? घ्या जाणून..

Chanakya Niti for life: या तीन वाईट सवयी उठवतील जीवनातून; नोकरी सोडा छोकरीही मिळणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.