Asia Cup Final 2023: चहलची कारकीर्द संपुष्टात? मी कर्णधार असे पर्यंत तू संघाबाहेर…;” हे काय बोलून गेला रोहित शर्मा..

0

Asia Cup Final 2023: सुपर4 (super 4) मधील चौथ्या सामन्यात भारतीय संघाची श्रीलंकेने दमछाक केली. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. भारतीय संघ केवळ 213 धावाच करू शकला. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागेल, असं वाटत होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारताला 41 धावांनी विजय मिळवून दिला.

भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार खेळावर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलाच खुश झाल्याचं पाहायला मिळाले. सामना संपल्यानंतर, पत्रकारांची संवाद साधताना रोहित शर्माने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादवचे (Kuldeep Yadav) तोंड करून कौतुक केले. गेल्या वर्षभरापासून कुलदीप यादव भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. कुलदीप यादवमुळे चहलला मात्र भारतीय संघात संधी मिळताना दिसत नाही.

अशातच कॅप्टन रोहित शर्माने एक महत्त्वाचे विधान केलं असून, रोहित शर्माच्या विधानामुळे आता युजवेंद्र चहलची (Yuzvendra chahal) कारकीर्द जवळपास संपुष्टात आली असल्याचं बोललं जात आहे. आगामी विश्वचषकाच्या भारतीय संघात देखील युजवेंद्र चहलला संधी मिळाली नाही. चहल सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे.

सामन्यानंतर रोहित शर्मा पत्रकाराची संवाद साधताना म्हणाला, दुखापतीनंतर कमबॅक करणं खूप अवघड आहे. कुलदीप यादवने आपल्या बॉलिंग स्पीड आणि ॲक्शनमध्ये बराचसा बदल केला आहे. याचं सगळं श्रेय त्यालाच जातं. गेल्या वर्षभरापासून तो सातत्याने चांगला खेळाचा प्रदर्शन करत आहे. या सामनेदेखील त्याने भेदक मारा करत आम्हाला विजय मिळवून दिला.

आमच्यासाठी हा सामना जिंकण सोपं नव्हतं. मात्र कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याने दमदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्याच जोरावर आम्ही हा सामना जिंकू शकलो. एवढंच नाही, तर करणार रोहित शर्मा म्हणाला, मी असेपर्यंत कुलदीप यादव भारतीय संघात खेळेल. रोहित शर्माच्या या विधानाचा थेट संबंध चहलच्या क्रिकेट करिअरशी जोडला गेला. रोहित च्या या विधानामुळे चहलची कारकीर्द संपुष्टात आली असल्याचंही बोललं जात आहे.

हे देखील वाचा Asia Cup super 4: पाकिस्तान नव्हे श्रीलंका खेळणार भारतासोबत फायनल; असं आहे Asia Cup Final चं गणित..

Chanakya Niti for life: या तीन वाईट सवयी उठवतील जीवनातून; नोकरी सोडा छोकरीही मिळणार नाही..

Mobile Addiction: मोबाइल जवळ घेऊन झोपताय? थांबा पहिले हे वाचा, आणि किती लांब असावा हेही जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.