Asia Cup super 4: पाकिस्तान नव्हे श्रीलंका खेळणार भारतासोबत फायनल; असं आहे Asia Cup Final चं गणित..

0

Asia Cup super 4: आशिया चषक स्पर्धा (Asia Cup 2023) आता अंतिम टप्प्यात आली असून, भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघासोबत आता फायनल कोण खेळणार? या प्रश्नाचे उत्तर आज रात्री अधिकृतरित्या मिळू शकते. मात्र क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तानला (India vs Pakistan) या दोन संघामध्येच आशिया चषक स्पर्धेची फायनल होण्याची अपेक्षा आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यामध्ये आज आशिया स्पर्धेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना भारतासोबत फायनल कोण खेळणार हे निश्चित करणार आहे. श्रीलंकेमध्ये हा सामना होणार असल्याने, सोबतच फिरकी गोलंदाजांना ही खेळपट्टी साथ देणारी असल्याने, श्रीलंका संघ जिंकण्याची शक्यता अधिक आहे.

श्रीलंका आणि भारतामध्ये झालेल्या सुपर4 मधील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने विजय संपादन केला. मात्र या सामन्यात श्रीलंके संघाने भारतीय फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात चांगलेच अडकवले. पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी केली. मात्र श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजी कोलमडली.

ज्या मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. आज त्याच मैदानावर पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा देखील सामना होणार आहे. साहजिकच प्रेमदासा स्टेडियम कोलंबो मधील खेळपट्टी फिरकीपट्टूंना साथ देणारी असल्याने, पाकिस्तानच्या फलंदाजांना श्रीलंकेचे फिरकीपट्टू आपल्या जाळ्यात अडकवू शकतात.

पाकिस्तान संघाकडे दर्जेदार स्पिनर्स नसल्याने, पाकिस्तानचा संघ आजच्या सामन्यात पिछाडीवर आहे. पाकिस्तान संघाच्या गोलंदाजीची मदार जलदगती गोलंदाजावरच आहे. प्रेमदासा खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देणारी असल्याने, जलदगती गोलंदाज फारसे फायदेशीर ठरणार नाहीत. त्यामुळे पाकिस्तान संघासमोर ही मोठी दोखेदुखी आहे.

एकीकडे पाकिस्तान संघाकडे स्पिनर दर्जेदार नाहीत, तर दुसरीकडे भारताविरुद्ध पाकिस्तान संघाच्या फलंदाजांनी देखील सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाकिस्तान संघाच्या फलंदाजांवर दबाव असणार आहे. आज जो संघ जिंकेल, तो रविवारी 17 तारखेला भारताबरोबर आशिया चषक 2023 ची फायनल खेळणार आहे.

हे देखील वाचा Chanakya Niti for life: या तीन वाईट सवयी उठवतील जीवनातून; नोकरी सोडा छोकरीही मिळणार नाही..

physical relationship: संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..

Mobile Addiction: मोबाइल जवळ घेऊन झोपताय? थांबा पहिले हे वाचा, आणि किती लांब असावा हेही जाणून घ्या..

Couple Metro Romance Video: ते करताना दोन प्रेमींना म्हातारीने पकडलं रंगेहात; पुढे काय घडलं? तुम्हीच पहा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.