Mobile Addiction: मोबाइल जवळ घेऊन झोपताय? थांबा पहिले हे वाचा, आणि किती लांब असावा हेही जाणून घ्या..
Mobile Addiction: प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईलला (mobile) अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर मोबाईल ही देखील अनेकांची मूलभूत गरज बनली आहे. आता अनेकांना उठता-बसता मोबाईल लागतो. अगदी जेवताना देखील अनेकांना मोबाईल लागतो. माझा मोबाईल इतका चांगला आहे, तितकाच तो घातकही आहे. मोबाईल मुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
अनेकांना झोपताना मोबाईल उशाखाली किंवा जवळ घेऊन झोपायची सवय असते. मात्र ही त्यांची सवय आरोग्याच्या अनेक समस्या घेऊन येते. हे अनेकांना माहीतही नाही. WHO ने प्रसारित केलेल्या अहवालानुसार झोपताना मोबाईल किती दूर असायला हवा? याविषयी देखील स्पष्ट केले आहे. मोबाईल जवळ घेऊन झोपल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात? यावर देखील सांगण्यात आले आहे. वाचा सविस्तर..
मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने, आरोग्यावर काय परिणाम होतोय? याविषयी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपला अहवाल सादर केला आहे. सर्वेनुसार तब्बल 90 टक्के किशोरवयीन मुलं मोबाईल झोपताना जवळ ठेवून झोपतात. तर जवळपास साठ टक्के प्रौढ मंडळी देखील मोबाईल जवळ ठेवून झोपत असल्याचं समोर आले आहे.
मोबाईल मधून रेडिएशन बाहेर पडतात. हे मनुष्याच्या शरीरासाठी फार घातक आहेत. झोपताना मोबाइल किमान तीन-चार फूट लांब असणे आवश्यक आहे. मोबाईल मधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे डोकेदुखी प्रजनन क्षमता देखील कमी होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सोबतच हाडांच्या समस्या देखील उद्भवतात. अशीही माहिती समोर आली आली.
डब्ल्यूएचओच्या मते, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि प्रजनन क्षमता देखील प्रभावित होते. मोबाईलद्वारे बाहेर येणारी ब्लू लाईटमुळे मनुष्यातील हार्मोन्सच्या समतोलमध्ये बिघाड होतो. मोबाइल जवळ असल्याने, रात्री पुरेशी झोप देखील होत नाही.
हे देखील वाचा Chanakya Niti: प्रत्येक क्षेत्रात अपयश येतंय? चाणक्यांनी सांगितलेली ही गोष्ट लक्षात ठेवा, यश घालेल लोटांगण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम