IND vs PAK Super 4: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल परतणार; या दोन कारणामुळे खेळणार ईशान, तर या खेळाडूला मिळणार डच्चू..

0

IND vs PAK Super 4: आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेतील सुपर फोर सामन्याला (Asia Cup super 4 matches) आता सुरुवात झाली आहे. सुपर4 पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने बांगलादेश संघाला चारीमुंड्या चीत करत दमदार सुरुवात केली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ इतर संघाच्या तुलनेत अधिक समतोल आणि बलशाली वाटत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला देखील पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी गुडघे टेकायला लावले होते. आता सुपर फोरमधील तिसरा सामना 10 सप्टेंबरला भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध खेळायचा आहे.

पावसामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान पहिला सामना पूर्ण होऊ शकला नाही. मात्र या सामन्यात पाकिस्तान संघ भारतीय संघाला वरचड ठरला. आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारत पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. मात्र याही सामन्यात पावसाचे सावट आहे. 10 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्या केएल राहुल (kl Rahul) परतणार आहे. केएल राहुलचा थेट भारताच्या अंतिम 11 मध्ये समावेश केला जाणार असल्याने, फलंदाजी क्रम आणि संघ निवडीत काही बदल होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात ईशान किशनने (ishan Kishan) दमदार खेळाचे प्रदर्शन केले. दुखापतीमुळे राहुल उपस्थित नसल्याने, ईशान किशनला खेळणयची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले. मात्र आता केएल राहुलचे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन होणार असल्याने, ईशान किशनला प्लेइंग11 मध्ये खेळण्याची संधी मिळणार नसल्याचं चित्र होते.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन होणार असल्याने, ईशान किशनला बाहेर बसावं लागणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र यात आता मोठा बदल झाल्याची माहिती मिळाली आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या ईशान किशनला टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मा (rohit sharma) प्लेइग 11 मध्ये संधी देणार असल्याची माहिती आहे. ईशान किशनला फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) जागेवर ईशान ईशानला खेळवण्याची दोन कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे ईशान किशनचा फॉर्म, आणि दुसरा भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये एकही डावखुरा खेळाडू नाही. रवींद्र जडेजा असला तरी तो खूप खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतो. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या जागेवर केएल राहुलचा भारताच्या संघात समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे देखील वाचा Couple Metro Romance Video: ते करताना दोन प्रेमींना म्हातारीने पकडलं रंगेहात; पुढे काय घडलं? तुम्हीच पहा..

Bharat: आपल्या देशाला भारत आणि इंडिया ही दोन्हीं नावे कशी पडली? फारच रंजक आहे इतिहास, वाचा सविस्तर..

Green Chilli: बाजारातून आणल्यानंतर हिरवी मिरची लगेच सुकते, लाल पडते? मग वापरा ही स्ट्रिक, मिरची राहील हिरवीगार..

AFG vs SL: थोडक्यात पराभव झाला आणि राशिद खान  रडू लागला; पाहा शेवटच्या दोन मिनिटात कसा खेळ पालटला..

Manoj jarange: जे बोलायचंय ते मोठ्याने बोला, कानात कुजबूज कराल तर..; जरांगेंनी भाजपच्या नेत्याला भरला दम, व्हिडिओ तुफान व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.