PAK vs SL: दोन्हीं संघांनी 252 धावाच केल्या, मग श्रीलंकेला का विजयी घोषित केले? घ्या जाणून..

0

PAK vs SL: सुपर4  (Asia Cup super 4) मधील अखेरचा सामना आज भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात होणार असला तरी आशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धेचे दोन फायनललिस्ट निश्चित झाले आहेत. अनेकांना भारताबरोबर पाकिस्तान फायनलमध्ये भिडेल असं वाटत होतं. मात्र श्रीलंकेने पाकिस्तान संघाला दणका देत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आता रविवारी 17 तारखेला फायनल खेळवली जाईल. (India vs srilanka Asia Cup Final 2023)

पाकिस्तान संघाला चारीमुंड्या चित करत श्रीलंकेने फायनलमध्ये प्रवेश केला असला तरी, या सामन्यात एक रंजक गोष्ट घडली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 45 षटकांचा करण्यात आला. सामना सुरू झाल्यानंतर, पुन्हा एकदा पाऊस आला. आणि आणखी तीन षटके कमी करून, हा सामना 42 षटकांचा खेळवला गेला.

पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा निम्मा संघ एक 130 धावांत बाद केला. मात्र मोहम्मद रिजवान आणि इप्तिकार अहमद या दोघांनी सहाव्या विकेटसाठी तब्बल 108 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे पाकिस्तान संघाला 42 षटकात 252 धावांचे आव्हान उभं करता आले. हा सामना पाकिस्तानचा संघ जिंकेल, असं वाटत होतं. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या या मनसुब्यावर पाणी सोडले.

पहिल्या चेंडूपासूनच श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला. श्रीलंका संघाला 42 धावांची आवश्यकता असताना कुशल मेंडिस (Kusal Mendis) बहारदार 91 धावांची खेळी करून बाद झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्याने मैदानाच्या चौफेर बाजूनी फटकेबाज केली. कुशल मेंडिस बाद झाल्यानंतर, मात्र श्रीलंका संघाच्या हातात असणारा सामना पाकिस्तान संघाच्या बाजूने झुकला.

ठराविक अंतराने श्रीलंकेचे एक एक फलंदाज बाद होत गेले. शेवटच्या दोन चेंडूत श्रीलंका संघाला सहा धावांची आवश्यकता होती. चारिथ असलंकाने (Charith Asalanka) पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर दोन धावा काढल्या. आणि श्रीलंका संघ विजयी झाला. मात्र पाकिस्तान संघाने 252 धावा केल्या. आणि श्रीलंका संघाने देखील 252 धावाच केल्या. तरी देखील श्रीलंका संघाला विजयी घोषित केलं.

दोन्ही संघांनी सारखीच धावसंख्या करूनही श्रीलंका विजय झाल्याने, अनेकजण संभ्रमात असल्याचं पाहायला मिळाले. परंतु पाऊस आल्याने, डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा डाव झाल्यानंतर, श्रीलंका संघाला 253 ऐवजी 252 हीच विजयी धावसंख्या देण्यात आली.

जर श्रीलंका संघाने 251 धावा केल्या असत्या, तर हा सामना बरोबरत सुटला असता. आणि रनरेटच्या आधारावर श्रीलंका संघ फायनलमध्ये पोहोचला असता. भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा मोठ्या फरकाने पराभव केल्याने, पाकिस्तान संघाचे रनरेट श्रीलंका संघापेक्षाही खराब आहे.

हे देखील वाचा Asia Cup Final 2023: चहलची कारकीर्द संपुष्टात? मी कर्णधार असे पर्यंत तू संघाबाहेर..” हे काय बोलून गेला रोहित शर्मा..

Asia Cup super 4: पाकिस्तान नव्हे श्रीलंका खेळणार भारतासोबत फायनल; असं आहे Asia Cup Final चं गणित..

Chanakya Niti for life: या तीन वाईट सवयी उठवतील जीवनातून; नोकरी सोडा छोकरीही मिळणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.