India vs Bangladesh: भारत फायनल जिंकणार की नाही? आजचा सामनाच ठरवणार..

0

India vs Bangladesh: भारत आणि श्रीलंका (India and Sri Lanka in to the final) हे दोन संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचले आहेत. (India and Sri Lanka in to the Asia Cup 2023 final) या दोघांमध्ये आता रविवारी 17 सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेचा (Asia Cup) अंतिम सामना खेळवला जाईल. श्रीलंका संघाने पाकिस्तान संघाचा काल पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. भारत यापूर्वीच फायनलमध्ये पोहोचला आहे. आज भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) या दोघांमध्ये सुपर4 मधील अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

निकालाच्या दृष्टीने आजच्या सामन्याला फारसं महत्त्व नसलं तरी आजचा सामनाच भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकू शकतो का? हे ठरवणार आहे. पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय टॉप ऑर्डर लडखडल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या सुपर4 सामन्यात भारतीय सलामीवीर आणि मधल्या फळीनेही दमदार खेळ सादर केला.

परंतु श्रीलंके विरुद्ध झालेल्या सुपर4 सामन्यात भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. रोहित शर्मा (Rohit Sharma) वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आलं नाही. श्रीलंके विरुद्ध भारतीय संघाला केवळ 213 धावा करता आल्या. मात्र गोलंदाजाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामन 41 धावांनी जिंकला.

काल पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळ सादर करत सामना जिंकल्याने, भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. श्रीलंका संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, तो अनप्रेडिक्टेबल आहे. कधी कोणता फलंदाज दमदार खेळ करेल, हे सांगता येणे खूप अवघड आहे. सध्या त्यांचा आत्मविश्वास देखील कमालीचा वाढला आहे.

दुसरीकडे मात्र भारतीय फलंदाजाच्या खेळात सातत्य पाहायला मिळत नाही. आज बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार असून, आजचा सामनाच भारतीय संघ फायनल जिंकू शकतो की नाही हे ठरवणार आहे. भारतीय संघाने जर फलंदाजी आणि गोलंदाजीतही दमदार खेळ केला, तरच श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या फायनलमध्ये भारतीय संघ जिंकण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेचा संघ अनप्रेडिक्टेबल आहे. शिवाय त्यांचे फलंदाज देखील दमदार फॉर्ममध्ये आहेत. याशिवाय त्यांचे फिरकीपटू लईत आहेत. गेल्या काही वर्षापासून भारतीय संघाच्या फलंदाजांचे आकडे लेप्ट आर्म स्पिनर समोर खूपच खराब आहेत. खासकरून विराट कोहलीचे. विराट कोहली निर्णायक सामन्यात उत्कृष्ट खेळ सादर करतो.

मात्र दुनिथ वेल्लागेचा (Dunith Wellalage) सामना विराट कसा करणार यावर सगळं काही अवलंबून असणार आहे. दोन्ही संघांमध्ये याअगोदर झालेल्या सामन्यात लेप्ट आर्म स्पिनर दुनिथ वेल्लागेने (Dunith Wellalage) भारताच्या पाच प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवले होते. फायनलच्या सामन्यात देखील त्याच्या गोलंदाजीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. भारताच्या विजयी किंवा पराभवाचे तोच महत्त्वाचे कारण ठरणार आहे.

हे देखील वाचा PAK vs SL: दोन्हीं संघांनी 252 धावाच केल्या, मग श्रीलंकेला का विजयी घोषित केले? घ्या जाणून..

Asia Cup Final 2023: चहलची कारकीर्द संपुष्टात? मी कर्णधार असे पर्यंत तू संघाबाहेर..” हे काय बोलून गेला रोहित शर्मा..

Chanakya Niti for life: या तीन वाईट सवयी उठवतील जीवनातून; नोकरी सोडा छोकरीही मिळणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.