IND vs SL Asia Cup final: एवढा माज बरा नाही..! गिलने ती मागणी करताच रोहित म्हणाला, अजिबात नाही, मूर्ख आहेस का; पाहा व्हिडिओ..

0

IND vs SL Asia Cup final: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आज आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून हा सामना सुरू होणार आहे. पावसामुळे सामना उशिरा सुरू होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे आजच्या दिवशी सामना झाला नाही तर मात्र दोन्ही संघांना सहविजेता घोषित करण्यात येणार आहे. (Asia Cup final 2023)

आज भारतीय संघ श्रीलंके बरोबर आशिया स्पर्धेच्या विजेतेसाठी दोन हात करणार आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांच्या संभाषण दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. ज्यात रोहित शर्मा शोभून गेला चक्क मूर्ख आहेस का? असं म्हणून गेला आहे. (Shubman Gill Rohit Sharma Viral video)

बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या सुपर4 मधील अंतिम सामन्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातं आहे. भारतीय संघाला बांगलादेश संघाकडून पराभव पत्करावा लागला. मात्र या सामन्यात शुभमन गिलने एक हाती किल्ला लढवत, भारतीय संघाला अखेर पर्यंत जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या होत्या.

बांगलादेश संघाने भारतासमोर 265 धावांचे आव्हान उभं केलं. मात्र भारतीय फलंदाजांना हे आव्हान पेलवलं नाही. ठराविक अंतराने भारत भारताचे फलंदाज बाद होत गेले. शुभमनने अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. त्याने 133 चेंडूत 121 धावांची खेळी केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा पराभव निश्चित झाला.

आता या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरस झाला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल चर्चा करत आहेत. शुभमन गिलला काही तरी हवं आहे. तो रोहित शर्माकडे काहीतरी मागणी करत आहे. मात्र त्याची मागणी रोहित शर्माने फेटाळून लावली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही स्पष्ट ऐकू शकता, शुभमन बोलल्यानंतर, रोहित शर्मा म्हणाला, “ऐसे नही होगा, पागल है क्या” रोहित शर्माने शुभमन गिलसोबत केलेल्या वर्तणूकीमुळे त्याला आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. एका नवीन खेळाडूने केलेली मागणी नम्रतेपूर्वक नाकारता देखील आली असती. मात्र रोहित शर्माने ज्या पद्धतीने भाषा वापरली आहे, ती खेळाडूचे मनोबल खच्चीकरण करणारी असल्याचं सोशल मीडियावर बोललं जातंय.

हे देखील वाचा IND vs SL Asia Cup 2023 Final: फायनलसाठी राखीव दिवस नाही,  सामना रद्द होण्याची शक्यता; सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी..

IND vs SL Asia Cup 2023 Final: फायनलसाठी राखीव दिवस नाही, उद्या सामना रद्द होण्याची शक्यता; सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी..

MS Dhoni Bike Riding Video: किती तो साधेपणा, रस्त्याने जाताना चक्क धोनीने तरुणाला दिली टू-व्हीलरवर लिफ्ट; पाहा व्हिडिओ..

Rekha Viral video: ..म्हणून सेल्फी मागायला गेलेल्या चाहत्यांच्या रेखाने वाजवली कानाखाली; पाहा व्हिडिओ..

Benefits of Raisins: तुम्हीही खाताय मनुके? मग हे एकदा वाचाच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.