Ravichandran Ashwin: अजित आगरकर फक्त नावाला, टीम रोहितच निवडतो; निवडीनंतर अश्विनच्या त्या वक्तव्यामुळे नवा वाद..

0

Ravichandran Ashwin: विश्वचषकापूर्वी (World Cup 2023) भारतीय संघाला (Indian team) ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या दीड वाजता सुरू होईल. रोहित शर्मा (Rohit Sharma) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) विराट कोहली (Virat Kohli) कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या चौघांना पहिल्या दोन्हीं सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी रविचंद्रन अश्विनला देखील संधी देण्यात आली आहे. (Ravichandran Ashwin)

आशिया चषक स्पर्धेत (asia Cup) अक्षर पटेलला दुखपत झाल्यामुळे त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली. अश्विनची भारतीय संघात निवड झाल्यानंतर, आता विश्वचषक संघात देखील अश्विनला संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडल्यानंतर, अश्विनने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रविचंद्रन अश्विनीची निवड ही अनेकांना धक्का देणारी होती. त्याचे कारण म्हणजे, गेल्या दीड वर्षात रविचंद्रन अश्विनने केवळ दोनच एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र अजित आगरकर (Ajit agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली रविचंद्रन अश्र्विनची निवड करण्यात आली. आता या निवडीनंतर अश्विनने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत रविचंद्रन अश्विनचा भारतीय संघात सामावेश केल्यानंतर, त्याने एक ट्विट केले. कॅप्टन रोहित शर्मा, आणि राहुल द्रविड यांनी टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही दोघांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच मला भारतीय संघात स्थान मिळाले. तुम्ही दिलेल्या संधीचे मी सोने करण्याचा प्रयत्न करेन.

रविचंद्रन अश्विनने दिलेल्या या प्रतिक्रियामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर राहुल द्रविड आणि रोहित शर्मा हे दोघेच भारतीय संघ निवडतात. अजित आगरकर हे केवळ नावापुरते निवड समितीचे अध्यक्ष आहेत. भारतीय संघात कोणाला निवडायचं? कोणाला वगळायचे हे सर्व कॅप्टन आणि कोच ठरवतात. रवीचंद्रन अश्विनच्या विधानामुळे देखील हे स्पष्ट होत असल्याचे सोशल मीडियावर बोललं जात आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ निवडल्यानंतर, अजित आगरकर आणि रोहित शर्माने पत्रकारांची संवाद साधला. एकीकडे या पत्रकार परिषदेत रोहित शर्माची देहबोली सर्व काही सांगून जात होती. तर दुसरीकडे अजित आगरकर केवळ पत्रकार परिषदेत आपला चेहरा दाखवण्या पुरतेच उपस्थित होते.

हे देखील वाचाODI World Cup 2023: वर्ल्ड कप मधील पाकिस्तानचा सामना होणार प्रेक्षकांवीणा; प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्याचे कारणही BCCI ने केले स्पष्ट..

india vs australia odi: अश्विनच्या समावेशानंतर टीम इंडियाच्या playing11 मध्ये झाला हा मोठा बदल; या दोन खेळाडूंना बसावं लागणार बाहेर..

india vs australia odi: अश्विनच्या समावेशानंतर टीम इंडियाच्या playing11 मध्ये झाला हा मोठा बदल; या दोन खेळाडूंना बसावं लागणार बाहेर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.