ODI World Cup 2023: वर्ल्ड कप मधील पाकिस्तानचा सामना होणार प्रेक्षकांवीणा; प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्याचे कारणही BCCI ने केले स्पष्ट..

0

ODI World Cup 2023: 5ऑक्टोंबर पासून भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. नुकताच आशिया चषक पार पडला. यावर्षी झालेला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र BCCI ने पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचं सांगितल्याने, हायब्रीड मॉडेल नुसार आशिया चषक पार पडला. भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले.

आता आशिया चषक पार पडला असला तरी त्यापूर्वी पाकिस्तान संघाने वेगळी भूमिका घेतली होती. जर भारत आशिया चषक स्पर्धा खेळायला पाकिस्तानमध्ये आला नाही, तर आम्ही देखील भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये भाग घेणार नाही. अशी भूमिका घेतली. भारताला पाकिस्तान शिवाय विश्वचषक पार पाडावा लागेल. असं ठणकावून पाकिस्तानने भारताला सांगितले.

मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नमती भूमिका घेतली. विश्वचषक 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी सराव सामने देखील खेळण्यात येणार आहेत. पाकिस्तान आणि न्युझीलंडमध्ये (PAK vs NZ) देखील 29 सप्टेंबरला हैदराबाद या ठिकाणी सराव सामना पार पडणार आहे. आता या सामन्याला गालबोट लागले आहे.

पाकिस्तानी न्युझीलंड यांच्यामध्ये 29 सप्टेंबरला होणारा सराव सामना आता प्रेक्षकांशिवाय पार पडणार आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद या ठिकाणी पार पडणाऱ्या या सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बीसीसीआयने स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्याचे कारण देखील स्पष्ट केले आहे.

29 सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्याचे कारण स्पष्ट करताना सांगितले, हैदराबादमध्ये आदल्या दिवशी २८ तारखेला गणेश विसर्जन त्याचबरोबर मिलन उन नबी हे दोन्ही कार्यक्रम पर पडणार आहेत. त्यामुळे पोलिसांना या दोन्ही कार्यक्रमासाठी बंदोबस्त द्यावा लागणार आहे.

रात्रभर पोलीस यंत्रणा व्यस्त असणार आहे. त्यामुळे 29 सप्टेंबरला लगेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याला देखील सुरक्षा पुरवणे शक्य होणार नसल्याचं हैदराबाद क्रिकेट असोसिएशन कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. हैदराबाद क्रिकेटने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहते आता नाराज आहेत. विश्वचषकातले केवळ तीनच सामने या मैदानावर पार पडणार आहेत. मात्र यामध्ये भारताचा एकाही सामन्याचा समावेश करण्यात आला नाही.

हे देखील वाचा AUS vs IND: Virat Kohli च्या आरामाचे आकडे पाहून तुमचेही डोळे फिरतील; का दिला जातोय विराटला आराम..

india vs australia odi: अश्विनच्या समावेशानंतर टीम इंडियाच्या playing11 मध्ये झाला हा मोठा बदल; या दोन खेळाडूंना बसावं लागणार बाहेर..

IND vs AUS: त्या तिघांना संधी मिळण्यासाठी विराट, रोहित, हार्दिकला विश्रांती; पण खरचं तिघे World Cup 2023 खेळतील..

WhatsApp Channel Create: या पद्धतीने तयार करा WhatsApp Channel; आणि एकाचवेळी लाखो लोकांना मेसेज पाठवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.