IND vs AUS: त्या तिघांना संधी मिळण्यासाठी विराट, रोहित, हार्दिकला विश्रांती; पण खरचं तिघे World Cup 2023 खेळतील..

0

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्याची मालिका 22 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. एकदिवसीय विश्वचषकाला 5 ऑक्टोंबर पासून सुरुवात होत आहे. भारतामध्ये विश्वचषक होणार असल्याने, ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. असं असलं तरी पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या चौघांना विश्रांती देण्यात आली आहे.

विराट कोहली,रोहित शर्मा, हार्दिक पांड्या पहिले दोन एकदिवसीय सामने खेळणार नाहीत. टीम मॅनेजमेंटने घेतलेल्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. विश्वचषक सामन्यात भारतीय संघाकडून जे अंतिम अकरा खेळाडू मैदानात उतरणार आहेत. त्यांना अधिक सरावाची आवश्यकता होती. मात्र असं असतानाही या प्रमुख तीन फलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. तिघांनाही विश्रांती देण्याचे कारण आता समोर आले आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या फलंदाजीची समस्या काही प्रमाणात दूर झाली. मात्र अद्याप भारताची प्लेइंग इलेव्हन काय असेल, याविषयी ठामपणे सांगता येणे अवघड आहे. भारतीय संघ विश्वचषकात कोणते अंतिम 11 खेळाडू घेऊन मैदानात उतरणार आहे. याविषयी अधिक स्पष्टता यावी, यासाठी काही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन सामन्यात संधी मिळवण्यासाठी विराट आणि हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे.

श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, आणि ईशान किशन, या तिघांमध्ये कोणते दोन खेळाडू मधल्या क्रमांकात खेळवायचे, याविषयी अद्याप स्पष्टता झाली नाही. या तीनही खेळाडूंपैकी केवळ एकाच खेळाडूंला भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये संधी मिळणार आहे. मात्र तीनही खेळाडू लईत असायला हवे. याशिवाय मधल्या क्रमांकात कोण सर्वोत्कृष्ट खेळ करेल, हे देखील दोन सामन्यात पाहिले जाणार आहे.

भारताचा डाव गडगडल्यानंतर ईशान किशनने मधल्या क्रमांकावर पाकिस्तान विरुद्ध दमदार खेळ केला होता. दुखापती नंतर श्रेयस अय्यरला केवळ एकच सामना खेळण्याची संधी संधी मिळाली. त्यामुळे त्याला देखील या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळावी. सूर्यकुमार यादव एक हाती सामना जिंकण्याची ताकद ठेवतो.

साहजिकच सूर्यकुमार यादवचा देखील भारताच्या प्लेइंन इलेव्हनमध्ये विचार केला जात आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून रोहित, विराट आणि हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली असल्याची माहिती आता समोर आली आहे. मात्र टीम मॅनेजमेंटने घेतलेला हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट देखील येऊ शकतो. भारतीय संघाने जर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली, तर भारतीय संघावर दबाव असणार आहे.

हे देखील वाच WhatsApp Channel Create: या पद्धतीने तयार करा WhatsApp Channel; आणि एकाचवेळी लाखो लोकांना मेसेज पाठवा..

IND vs AUS ODI series: विराट, रोहित, हार्दिकच्या विश्रांतीचा निर्णय भोवणार; Asia Cup मध्ये उणीवा भरून निघाल्या, पण आता स्वतः च खोदला मोठा खड्डा..

IND vs AUS 1St ODI: रोहित, विराट, हार्दिकला विश्रांती; या चार नव्या खेळाडूंची संघात एन्ट्री: जाणून घ्या पहिल्या वनडे साठी भारतीय टीम..

IND vs SL Asia Cup final: एवढा माज बरा नाही..! गिलने ती मागणी करताच रोहित म्हणाला, अजिबात नाही, मूर्ख आहेस का; पाहा व्हिडिओ..

Babar Azam: Asia Cup मधून बाहेर होताच पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा; ..म्हणून बाबर शाहीन आफ्रिदी एकमेकांना भिडले; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.