BSNL Recharge plan: Jio Airtel चा उठला बाजार; BSNL देतंय 400 रुपयांत तीन महिने दररोज 2GB data, वाचा सविस्तर..

0

BSNL Recharge plan: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी jio ने सुरुवातीला अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंग मोफत दिले. आपले ग्राहक वाढल्यानंतर, जिओने मोठ्या प्रमाणात प्लॅन दर आकाराला सुरुवात केली. डाटा वापरायची सवय झाल्यानंतर ग्राहकांना आता प्लॅन वापरण्याशिवाय पर्याय उरला नाही. अनेक जण jio प्लॅन दरामुळे वैतागलेले आहेत. जर तुम्ही देखील Jio च्या प्लॅन दरामुळे हैराण असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

एअरटेल जिओ टेलिकॉम कंपनीचा बाजार उठवण्यासाठी आता सरकारी कंपनी बीएसएनएल सज्ज झाली आहे. BSNL ने नुकतेच आपले दोन नवीन रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. बीएसएनएलने सादर केलेल्या दोन नवीन रिचार्ज प्लॅनमुळे आता Airtel, jio कंपनीची दोखेदुःखी वाढली आहे. 411 आणि 788 असे दोन रिचार्ज प्लॅन बीएसएनएलने बाजारात उतरवले आहेत. ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

बीएसएनएलने लॉन्च केलेल्या या दोन रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 90 आणि 180 दिवसांची वैधता मिळणार आहे. या वैधतेसह ग्राहकांना दररोज दोन जीबी डाटा दिला जाणार आहे. BSNL चा 411 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांची वैधता, त्याचबरोबर दोन जीबी प्रति दिवस डाटा दिला जात आहे. विशेष म्हणजे दिवसभरात दोन जीबी डाटा संपल्यानंतर देखील तुमचे नेट ४० Kbps सह चालणार आहे.

बीएसएनएलने लॉन्च केलेल्या दुसऱ्या प्लॅन विषयी अधिक जाणून झाल्यास, हा रिचार्ज 788 रुपयासह येतो. या पॅनमध्ये ग्राहकांना तबले 180 दिवसांची व्हॅलिडीटी मिळत आहे. यामध्ये प्रति दिवस दोन जीबी डाटा देण्यात येतो म्हणजेच, तुम्हाला 360 जीबी डाटा देण्यात येणार आहे. Jio किंवा Airtel टेलिकॉम कंपनीचा तीन महिन्याचा रिचार्ज जर तुम्ही करायला गेला, तर तुम्हाला जवळपास आठशे रुपये द्यावे लागतात.

BSNL हळूहळू आता 4G नेटवर्क निर्मितीकडे वळला असून, ग्राहकांना या दोन्ही प्लॅनचा जबरदस्त फायदा होणार आहे. नेटवर्कच्या बाबतीत काही ठिकाणी बीएसएनएलची स्थिती चांगली नसली तरी, आता सरकारने टेलिकॉम क्षेत्राकडे आपलं पाऊल टाकलं आहे. BSNL ला ग्राहक पहिल्या पसंतीचे नेटवर्क म्हणून प्राधान्य देतील. असं सरकारचे धोरण आहे.

हे देखील वाचा IND vs AUS 1st ODI: सूर्या, तिलक वर्माला मिळणार का संधी? जाणून घ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या ODI साठी भारतीय संघ..

Ravichandran Ashwin: अजित आगरकर फक्त नावाला, टीम रोहितच निवडतो; निवडीनंतर अश्विनच्या त्या वक्तव्यामुळे नवा वाद..

WhatsApp Channel Create: या पद्धतीने तयार करा WhatsApp Channel; आणि एकाचवेळी लाखो लोकांना मेसेज पाठवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.