Redmi Note 13: 100MP कॅमेरा असलेला Redmi चा तगडा फोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..

0

Redmi Note 13: अलीकडे स्मार्टफोनला (smartphone) प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. अनेकांची स्मार्टफोन ही मूलभूत गरज आहे. खासकरून दर्जेदार कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोनला प्रचंड मागणी असते. परंतु चांगला कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोनच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे आपल्या बजेटमध्ये दर्जेदार स्मार्टफोन घेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो.

जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर रेडमीने आपला नवीन रेडमी नोट 13 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. Redmi कंपनीने या सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये Note 13 5G त्याचबरोबर Redmi Note 13 Pro, Redmi Note 13 Pro+ हे टीम स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Redmi Note 13 5G या स्मार्टफोनची किमती विषयी सांगायचं झाल्यास, हा स्मार्टफोन एकूण चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 6GB 128 GB ज्याची किंमत 14 हजार ठेवण्यात आली आहे. 15 हजार किंमत असणारा स्मार्टफोन ग्राहकांना 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह मिळणार आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 17,400 ठेवण्यात आली आहे.

Redmi Note 13 5G चे स्पेसिफिकेशन्स

रेडमी नोट 13 5 जी या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.67 इंच असून फुलएचडी+ फीचर्ससह लॉन्च करण्यात आला आहे. ज्याचा डिस्प्ले AMOLED देण्यात आला आहे. ब्राईटनेस देखील या स्मार्टफोनला दमदार देण्यात आला आहे. कॅमेरा आणि प्रोसेसर देखील दमदार असल्याने ग्राहकांना हा स्मार्टफोन आकर्षित करत आहे.

या स्मार्टफोनच्या कॅमेरा विषयी अधिक जाणून घ्यायचं झाल्यास, तब्बल 100 MP प्राइमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनला 16 MP कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, या स्मार्टफोनला तब्बल 5000 mAh असणार आहे. जी 33W चार्जरला सपोर्ट करते.

हे देखील वाचा Shreyas Iyer: सूर्या, ईशान की श्रेयस कोणाला मिळणार संधी? अखेर झालं स्पष्ट; असा असेल world Cup 2023 चा भारतीय संघ..

India playing 11 World Cup 2023: संघ झालाय दमदार, पण द्रविड, रोहितची ती चूक पडणार महागात; World Cup ही जाणार हातून..

WhatsApp Channel Create: या पद्धतीने तयार करा WhatsApp Channel; आणि एकाचवेळी लाखो लोकांना मेसेज पाठवा..

peanut chikki recipe: तुम्ही देखील खाता बाहेरची शेंगदाणा चक्की? शेंगदाणा चक्की बनवण्याची पद्धत पाहून पुन्हा तुम्ही हातही लावणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.