India playing 11 World Cup 2023: संघ झालाय दमदार, पण द्रविड, रोहितची ती चूक पडणार महागात; World Cup ही जाणार हातून..

0

India playing 11 World Cup 2023: आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेपूर्वी भारतीय संघामध्ये अनेक समस्या होत्या. मात्र आशिया चषक स्पर्धेनंतर बऱ्याच प्रमाणात समस्या दूर झाल्या आहेत. वर्ल्डकप पूर्वी आता भारतीय संघाकडे केवळ दोन सामने शिल्लक राहिले आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामान्यानंतर, भारतीय संघाची वर्ल्ड कप प्लेइंग इलेव्हन कशी असेल? हे देखील स्पष्ट होणार आहे.

आज ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर, भारताच्या वर्ल्डकप संघाची प्लेइंग इलेव्हन स्पष्ट होईल. असं असलं तरी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविडच्या (rahul dravid) एका चुकीमुळे विश्वचषक 2023 (world Cup 2023) भारतीय संघाच्या हातातून देखील जाऊ शकतो.

भारतीय संघ मैदानामध्ये बचावात्मक पवित्रा घेऊन मैदानात उतरत असल्याचं पाहायला मुळात आहे. एका अतिरिक्त फलंदाजाची आवश्यकता म्हणून, शार्दुल ठाकूरचा भारतीय संघ आपल्या प्लेइंग11 मध्ये समावेश करत आहे. ज्यावर आता अनेक क्रिकेट दिग्गजांनी देखील टीका केली आहे.

भारतीय संघाला जर आठव्या क्रमांकावर एका फलंदाजाची आवश्यकता असेल, तर भारताच्या प्रमुख फलंदाजांवर टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्माचा विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. जर सुरुवातीचे सहा, सात फलंदाज चांगला खेळ करू शकत नसतील, तर आपण आठव्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजाकडून वेगळी अपेक्षा काय करणार? यावर गांभीर्यपूर्वक विचार केला जाणार का हा मोठा प्रश्न आहे.

शार्दुल ठाकूर फलंदाजी करू शकतो, त्यामुळे त्याला भारताच्या प्लेइंग 11मध्ये संधी दिली जात आहे. मात्र त्याच्यामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या मोहम्मद शमीला (Mohammed Shami) प्लेइंग 11 मधून बाहेर बसावं लागत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने दमदार खेळ साकारला. शमीने ऑस्ट्रेलियाच्या पाच प्रमुख फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शमी जबरदस्त फॉर्ममध्ये असला तरी वर्ल्ड कपच्या अंतिम 11 मध्ये शार्दुल ठाकूरचीच निवड केली जाणार आहे. जर रोहित शर्मा (Rohit Sharma) राहुल द्रविड (rahul dravid) आणि टीम मॅनेजमेंटने ( Indian team management) शमी ऐवजी शार्दुल ठाकूरला (shardul Thakur) भारताच्या संघात संधी दिली, तर हा निर्णय धोकादायक ठरू शकतो.

कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटला आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडू कडून 30-35 धावांची अपेक्षा आहे. मात्र दुसरीकडे मोहम्मद शमीचा फॉर्म पाहता, त्याच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला 50 ते 60 धावांचा अतिरिक्त फायदा होण्याची दाट शक्यता आहे. अतिरिक्त फलंदाजाला प्रत्येक सामन्यात त्याची गरज भासेलच असं नाही. शिवाय संधी मिळाल्यानंतर, तो परफॉर्मन्स करतो की नाही, हाही मुद्दा आहे.

याशिवाय दुसरीकडे एका प्रॉपर जलदगती गोलंदाजाचा भारताच्या प्लेइंग 11मध्ये समावेश केल्याने, तो प्रत्येक सामन्यात दहा षटके टाकणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात तो परफॉर्मन्स करू शकणार आहे. मात्र टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मा एका अतिरिक्त फलंदाजांचा बॅकअप म्हणून, शार्दुल ठाकूरला खेळवत असला तरी हा निर्णय भारतासाठी नुकसानदायक आहे.

हे देखील वाचाIND vs AUS 2nd ODI: संघात स्थान पक्क करण्याची त्याच्याकडे आज शेवटची संधी; ..तर world Cup संघातूनही मिळणार डच्चू.. 

peanut chikki recipe: तुम्ही देखील खाता बाहेरची शेंगदाणा चक्की? शेंगदाणा चक्की बनवण्याची पद्धत पाहून पुन्हा तुम्ही हातही लावणार नाही..

robbery viral video: चोरी करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर गेला अंगावरून, तरीही बहाद्दराने केले ते काम; पाहा काळजाचा ठोका चुकणारा व्हिडिओ..

IND vs AUS: थाटात जिंकलो, पण त्या नव्या पेचाने रोहित शर्मा, राहुल द्रविडची झोप उडवली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.