IND vs AUS 2nd ODI: संघात स्थान पक्क करण्याची त्याच्याकडे आज शेवटची संधी; ..तर world Cup संघातूनही मिळणार डच्चू..

0

IND vs AUS 2nd ODI: तीन एकदिवसीय (IND vs AUS 3 ODI series) सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदोर मैदानावर पार पडणार आहे. सलग दुसरा पराभव करून ऑस्ट्रेलिया संघावर मालिका विजय साकारण्याचा इरादा भारतीय संघाचा असणार आहे. विश्वचषकाच्या (world Cup 2023) दृष्टीने भारतीय संघासाठी ही मालिका प्रचंड महत्त्वाची आहे. आजच्या सामन्यानंतर भारतीय संघाची वर्ल्डकप प्लेइंग 11 देखील निश्चित होणार आहे.

वर्ल्ड कपच्या दृष्टीने आजचा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा असला तरी काही खेळाडूंना वर्ल्डकप संघात स्थान मिळणार का? हे देखील निश्चित करणारा आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) विराट कोहली (Virat Kohli) आणि कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) संघात एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीवर टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार रोहित शर्माचे लक्ष असणार आहे.

दुखापतीमुळे दीर्घकाळ केएल राहुल आणि श्रेयस अय्यर (shreyas Iyer) भारतीय संघाचा भाग नव्हते. आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2023) या दोघांचे पुनरागमन झाले. केएल राहुलने (KL Rahul) दमदार पुनरागमन केले. मात्र श्रेयस अय्यरला अद्याप चांगला खेळ करता आला नाही. तिसऱ्या आणि अखेरचा एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रमुख फलंदाज परतणार असल्याने, आज त्याच्याकडे अखेरची संधी असणार आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा डाव गडगडल्यानंतर, सूर्यकुमार यादवने (suryakumar Yadav) अर्धशतकाची बहारदार खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमार यादवकडे एकहाती सामना जिंकू देण्याची क्षमता आहे. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने अनेकदा हे सिद्ध देखील केले आहे. त्यामुळे भारतीय टीम मॅनेजमेंट सूर्यकुमार यादवला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी सकारात्मक आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरला आज अखेरची संधी देण्यात येणार आहे. श्रेयस अय्यर जर आजच्या सामन्यात देखील अपयशी ठरला, तर वर्ल्ड कप संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणार नसल्याची माहिती आहे. श्रेयस अय्यरच्या जागेवर सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनला प्रथम पसंती दिली जाणार आहे.

अशी असेल भारताची अंतिम अकरा

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

हे देखील वाचा peanut chikki recipe: तुम्ही देखील खाता बाहेरची शेंगदाणा चक्की? शेंगदाणा चक्की बनवण्याची पद्धत पाहून पुन्हा तुम्ही हातही लावणार नाही..

robbery viral video: चोरी करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर गेला अंगावरून, तरीही बहाद्दराने केले ते काम; पाहा काळजाचा ठोका चुकणारा व्हिडिओ..

IND vs AUS: थाटात जिंकलो, पण त्या नव्या पेचाने रोहित शर्मा, राहुल द्रविडची झोप उडवली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.