Shreyas Iyer: सूर्या, ईशान की श्रेयस कोणाला मिळणार संधी? अखेर झालं स्पष्ट; असा असेल world Cup 2023 चा भारतीय संघ..

0

Shreyas Iyer: आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेपूर्वी भारतीय संघात प्रचंड समस्या होत्या. मात्र आशिया चषक स्पर्धेनंतर बऱ्याच समस्या दूर झाल्या. पहिल्या सामन्यात भारताचा डाव गडगडल्यानंतर ईशान किशनने 82 धावांची खेळी करत मिडल ऑर्डरची समस्या काही प्रमाणात सोडवली. त्यांनतर केएल राहुलने (KL Rahul) पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावत दमदार पुनरागमन केले. (India beat Australia 2nd ODI)

भारताच्या वर्ल्ड कप (World Cup 2023) संघाची अंतिम अकरा कशी असेल, याविषयी अनेक समस्या होत्या. मात्र आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध (IND vs AUS) झालेल्या दोन सामन्यानंतर, भारतीय संघातील प्रत्येक फलंदाज फॉर्ममध्ये परतला असून आता आपापल्या जागेवर प्रत्येकाने दमदार परफॉर्मन्स केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दोन एकदिवसीय सामन्यानंतर आता भारतीय संघाला वर्ल्ड कपचा अंतिम11 चा संघ देखील मिळाला आहे.

दुखापतीनंतर परतल्यानंतर, केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (shreyas Iyer) कशी कामगिरी करतात, याकडे अनेकांचे लक्ष होतं. भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करतो, हे केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या परफॉर्मन्सवर अवलंबून होतं. मात्र या दोन्ही फलंदाजाने दमदार पुनरागमन केल्याने, भारतीय संघ या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक बलशाली आणि फेवरेट मानला जात आहे.

फक्त केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हेच फलंदाज फॉर्ममध्ये आले नाही, तर त्यांच्यासोबत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) हे देखील जबरदस्त लईत आहेत. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्यापुढे वर्ल्डकपसाठी भारताची अंतिम 11 कशी निवडायची? ही सगळ्यात मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

आशिया चषकापूर्वी चार,पाच आणि सहाव्या क्रमांकासाठी भारतीय संघाची जबाबदारी कोण पार पाडणार? हा मोठा प्रश्न राहूल द्रविड (rahul dravid) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) समोर होता. आता मात्र चारही खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने, वर्ल्ड कप संघाच्या अंतिम 11 मध्ये कोणत्या दोन खेळाडूंना संधी द्यायची? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय संघासाठी ही एक चांगली डोकेदुखी मानली जात आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या तिसरी आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ आपला फुल स्कॉड उतरवणार आहे. हाच स्कॉड वर्ल्ड कपमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. खेळपट्टीवर देखील भारतीय संघाची अंतिम11 कशी असेल, हे अवलंबून असणार आहे. भारतीय संघाला वर्ल्डकप मधील आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक खेळपट्टीवर खेळायचा आहे.

चेन्नईची चेपॉक खेळपट्टी स्पिन गोलंदाजांना साथ देणारी आहे. श्रेयस अय्यर स्पिन गोलंदाजांना चांगला खेळतो. त्यामुळे पहिल्या सामन्यात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव ऐवजी श्रेयस अय्यरला पसंती दिली जाणार आहे. फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर सूर्यकुमार यादवला खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र वर्ल्ड कप संघाच्या अंतिम 11 मध्ये पहिली पसंती श्रेयस अय्यरला दिली जाणार आहे.

हे देखील वाचा India playing 11 World Cup 2023: संघ झालाय दमदार, पण द्रविड, रोहितची ती चूक पडणार महागात; World Cup ही जाणार हातून..

peanut chikki recipe: तुम्ही देखील खाता बाहेरची शेंगदाणा चक्की? शेंगदाणा चक्की बनवण्याची पद्धत पाहून पुन्हा तुम्ही हातही लावणार नाही..

robbery viral video: चोरी करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर गेला अंगावरून, तरीही बहाद्दराने केले ते काम; पाहा काळजाचा ठोका चुकणारा व्हिडिओ..

BSNL Recharge plan: Jio Airtel चा उठला बाजार; BSNL देतंय 400 रुपयांत तीन महिने दररोज 2GB data, वाचा सविस्तर..

Ravichandran Ashwin: अजित आगरकर फक्त नावाला, टीम रोहितच निवडतो; निवडीनंतर अश्विनच्या त्या वक्तव्यामुळे नवा वाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.